ठाणे :एकीकडे नववर्ष स्वागताच्या तयारीची सर्वत्र लगभग सुरू असतानाच ३१ डिसेंबरला भर दुपारच्या सुमारास कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी लगत नांदिवली परिसरात राजेश प्रजापती यांच्या इलेक्ट्रिक दुकानात एका चोरट्याने चोरी (Thieves) केल्याची घटना घडली होती. मात्र चोरी करताना दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद चोरटा कैद झाल्याने याबाबत दुकान मालकाने कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला होता. (burglary) गुन्हा दाखल होताच कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या (Thief caught on CCTV camera) माध्यमातून आरोपीचा शोध सुरू केला. अवघ्या काही तासातच एपीआय बोचरे व दिनकर पगारे त्यांच्या पथकाने या सराईत चोरट्याला कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात सापळा रचून बेड्या ठोकल्या (Thief Arrested in Thane) आहे.
Thane Crime : सराईत चोरट्याचे वय २२ अन् चोऱ्या केल्या २४; सीसीटीव्ही फुटेजमुळे अडकला पोलिसांच्या बेडीत - Thieves
एका २२ वर्षीय चोरट्याने तब्बल २४ चोऱ्या (Thieves), घरफोड्या (burglary) केल्याचे पोलीस तपास समोर आले. विशेष म्हणजे, हा सराईत चोरटा सीसीटीव्हीत कैद (Thief caught on CCTV camera) झाल्याने तो कोळसेवाडी पोलिसांच्या बेडीत अडकला (Thief Arrested in Thane) आहे. करण रश्मीन गडा असे या सराईत चोरट्याचे नाव आहे.
२४ पेक्षा अधिक चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल :पोलिसांच्या माहितीनुसार हा चोरटा एक सराईत आरोपी असून या आरोपीवर ठाणे, मुंबई , नविमुंबई परिसरात २४ पेक्षा अधिक चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहे. विशेष म्हणजे हा आरोपी दिवसा परिसरातील मोठे दुकानावर रेखी करत त्या दुकानात ग्राहक बनून गेल्यावर दुकानदाराची नजर चुकवून दुकानातील किमती वस्तूं, गल्ल्यातील पैसे लंपास करीत असल्याचे पोलीस तपास समोर आले. आता हा चोरटा सध्या कोळसेवाडी पोलिसांच्या कोठडीत असून त्याने आणखी या परिसरात किती गुन्हे दाखल केले. याचा तपास पोलीस पथकाने सुरु केला आहे.