ठाणे -कल्याण तालुक्यातील वालकस बेहरे गावाजवळ असलेल्या भिवंडी आणि वाशिंद शहराला जोडले आहे. याच शहरात जाण्यासाठी गावकऱ्यांना ५० वर्षांपूर्वी भातसा नदीवर पूल उभारण्यात आला. मात्र, ५० वर्षे जुना कमकुवत पूल पाण्याखाली गेला असून रहदारीचा पर्याय पूर्णपणे बंद आहे. अशावेळी वालकस बेहरे व मठाची वाडी येथील जवळपास १ हजार २०० नागरिकांची कोंडी झाली आहे. गावातून बाहेर पडण्यासाठी पर्यायी कल्याण-कसारा रेल्वे मार्गाचा उपयोग करावा लागत आहे. मात्र, ज्या मार्गाने जीवधोक्यात घालून रेल्वे रुळा शहरात जात आहे. त्यामुळे आतापर्यंत १४ निरपराध गावकऱ्यांचा रेल्वेच्या अपघात जीव गेला आहे.
गावकऱ्यांच्या जीवाला धोका -मागील वर्षी पावसाळ्यात पूल पाण्याखाली गेल्यानंतर गावातून बाहेर पडण्यासाठी रस्ता नसल्या कारणाने भगवान शंकर शेलार यांचा उपचाराअभावी दुर्दवी मृत्यू झाला होता. या गावात वयोवृद्ध व्यक्ती, गरोदर महिला, लहान मुले असताना त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून या वर्षीही एखादी निष्पाप व्यक्ती उपचाराअभावी आपला प्राण गमावते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. या गावात २५ विध्यार्थासह १५ ते २० कर्मचारी असून शाळकरी मुलांचे शिक्षणाचे नुकसान होत आहे. तर कर्मचारी कामावर जाऊ शकत नाहीत. अशी अस्वथा झाल्याची माहिती गावातील ग्रामस्थ चेतन कवाड यांनी दिली आहे.