मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेला हाच तो लोखंडी पूल ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जिल्ह्यात आजही बहुतांश आदिवासी गावपाड्यांवर जाण्या-येण्यास रस्ता नसल्याने अनेक रुग्णांचे जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र स्थानिक प्रशासन यावर गांभीर्याने ठोस उपाययोजना राबवताना दिसत नसल्याने आदिवासी बांधवांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. ठाणे जिल्ह्यातील एकट्या शहापूर तालुक्यात सुमारे ६५ आदिवासी गावपाड्यांवर रस्त्याअभावी येथील गावकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. यासाठी गेल्या काही वर्षांपासून श्रमजीवी संघटनेने अनेक आंदोलने, उपोषणे केली; मात्र प्रशासन आमच्या मागणीची दखल घेत नसल्याने अनेकांचे रस्त्याअभावी जीव गेल्याचे श्रमजीवी संघटनेचे शहापूर तालुका सचिव प्रकाश खोडका यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे, गेल्यावर्षी रस्त्याअभावी गरोदर महिलांचा मृत्यू झाल्याने १४ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयावर श्रमजीवी संघटनेच्या वतीने शासनाच्या निषेधार्थ डोली मोर्चा काढण्यात आला होता.
ना रस्ता, ना वीज पुरवठा :एकीकडे देशभरात ७५ वा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. मात्र, आजही स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटून गेली तरीदेखील शहापूर तालुक्यातील अनेक आदिवासी गाव-पाड्यांवर जाण्यासाठी रस्ते नाहीत. त्यामध्ये ग्रामपंचायत पिवळी पाडा–हेदूचापाडाला रस्ता तर नाहीच शिवाय वीजपुरवठा अद्याप गावात नसल्याने गावकऱ्यांच्या नशिबी मूलभूत सुविधांच्या अभावी जगणे आले आहे. या गावात १९ कुटुंबांची घरे आहेत. यातील २३ मुले-मुली शिक्षणासाठी ओढ्याच्या पात्रातून जीव धोक्यात घालून गावकऱ्यांनी उभारल्या लाकडी पुलावरून पावसाळ्याच्या दिवसात प्रवास करत होती. आता मात्र प्रशासनाने या पाड्यात जाण्यासाठी लोखंडी पूल उभारून गावकऱ्यांना दिलासा दिला.
पूराच्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान :शहापूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने लाकडी पूल पुराच्या पाण्याखाली गेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत असल्याची खंत पालकांनी व्यक्त केली होती. या गावातील समस्या जाणून घेण्यासाठी श्रमजीवी संघटना ठाणे जिल्हा कातकरी उपप्रमुख मालु हुमणे, तालुका सचिव प्रकाश खोडका, तालुका युवा प्रमुख रूपेश आहिरे यांनी भेट देऊन पाहणी केली. अनेक गावात मूलभूत सुविधा मिळत नसल्याने त्यांनी शासनाकडे त्याची मागणी केली होती.
'या' आदिवासी गाव-पाड्यांना रस्ते नाहीत:
ग्रामपंचायत कळंभे बोरशेती
१) देवीचापाडा
२) लोभीपाडा
३) पोढ्याचापाडा
ग्रामपंचायत मोखावणे
४) पाटीलवाडी
५) वारलीपाडा
ग्रामपंचायत ढाकणे
६)कातकरी वाडी
ग्रामपंचायत मीहीली
७) माळीपाडा
८) वाघीवाली
९) माळीपाडा ते टहारपूर
ग्रामपंचायत पिवळी
१०) गुरूडेपाडा
११) हेदूपाडा
१२) जांभुळपाडा
१३) नळाचीवाडी
ग्रामपंचायत वांद्रे
१४) आलनपाडा
१५) दोडकेपाडा
१६) भवरपाडा
ग्रामपंचायत खराडे
१७) कातकरी वाडी
ग्रामपंचायत अजनूप
१८) कोळीपाडा (शिवशेत)
१९) सावरकुट
ग्रामपंचायत आटगाव
२०) तळ्याचीवाडी (कातकरी वस्ती)
ग्रामपंचायत वेहळोली ब्रू
२१) कातकरी वस्ती
२२) फर्जनवाडी
ग्रामपंचायत उंभ्रई
२३) कातकरी वाडी
ग्रामपंचायत गुंडे डेहणे
२४)कोठावाडी (नदिवर फुल)
२५) भितारवाडी (नदिवर फुल)
ग्रामपंचायत नडगाव सो
२६) चाफेवाडी ( कातकरीवाडी)
ग्रामपंचायत शेई
२७) साखरवाडी
ग्रामपंचायत शेरे
२८)पाटीचा माळ
ग्रामपंचायत आल्यानी
२९) कृष्णाची वाडी
ग्रामपंचायत नेहरोळी
३०) सोनार शेत
३१) तईची वाडी
ग्रामपंचायत आसनगाव
३२) दत्तगुरु नगर
ग्रामपंचायत आवळे
३३) आंबेडोह (कातकरीवाडी)
३४) वाडुचापाडा
ग्रामपंचायत खातीवली
३५) वारली पाडा
३६) चौकीपाडा
ग्रामपंचायत वासिंद
३७) जांभूळ पाडा
ग्रामपंचायत साकडबाव
३८) तळ्याचीवाडी
ग्रामपंचायत कोठारे
३९)वेटा
ग्रामपंचायत वेळुक
४०) पटकीचापाडा
४१) तरीचापाडा
ग्रामपंचायत वेहलोंडे
४२)सापटेपाडा
४३) जाधवपाडा
४४) नासिक पाचकुडवेपाडा
ग्रामपंचायत अघई
४५) ठाकूरपाडा
ग्रामपंचायत फुगाळे
४६) वरसवाडी
ग्रामपंचायत आदिवली
४७) पायरवाडी
ग्रामपंचायत टेंभा
४८)आंबिवलीवाडी
४९) कातकरी वस्ती
ग्रामपंचायत वरस्कोळ
५०) कातकरी वाडी
ग्रामपंचायत वेहळोली व खराडे
५१) कृष्णाचीवाडी ते भावर्थेपाडा
ग्रामपंचायत शिरवंजे
५२) वाचकोले कातकरी वाडी
ग्रामपंचायत कानंडी
५३) वेहळोली कातकरी वाडी
ग्रामपंचायत भावसे
५४) भुसारेपाडा
५५) पाटीलपाडा
ग्रा.काजळविहीर पाषाणे
५६) पाषाणेवाडी
ग्रामपंचायत शिरोळ
५७) विहीरीचापाडा
५८) क्रांतिकारक नाग्या कातकरी वाडी
ग्रामपंचायत दळखन
५९)कातकरी वाडी
६०) विंचूपाडा
ग्रामपंचायत मुगांव
६१) पालेपाडा (नदीपाडा)
ग्रामपंचायत साठगाव
६२) कातकरी वाडी
ग्रामपंचायत वाशाळा
६३) सखारामपाडा
ग्रामपंचायत आवरे
६४) जांभुळपाडा
ग्रामपंचायत टहारपूर व मोहीली
६५) नेवरे ते टहारपूर जोडणारा रस्ता