नवी मुंबई -कर्नाळा बॅंकेत कोणत्याही प्रकारचा घोटाळा झाला नाही तर अनियमितता झाली आहे, असे स्पष्टीकरण शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि माजी आमदार विवेक पाटील यांनी केले आहे. तसेच राजकीय विरोधापोटी आपल्यावर आरोप केले जात असल्याचेही ते म्हणाले.
विवेक पाटील (अध्यक्ष, कर्नाळा बँक) शेकाप नेते विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखालील कर्नाळा नागरी सहकारी बँकेत संचालक मंडळाने केलेल्या बेकायदेशीर आणि अनागोंदी कारभारामुळे घोटाळा झाला आहे. हा घोटाळा किमान 1 हजार कोटी रुपयांचा असण्याची शक्यता आहे, असे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. तसेच या घोटाळ्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचेही सोमय्या यांनी म्हटले होते. यानंतर कर्नाळा बँकेत कोणत्याही प्रकारचा घोटाळा झाला नाही, असे स्पष्टीकरण बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांनी दिले आहे. तर कर्नाळा बॅंकेच्या कारभारात निश्चितच अनिश्चितता आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - 'कर्नाळा बँकेत किमान एक हजार कोटींचा घोटाळा'
आज जे मोठे उद्योजक म्हणून उदयाला आले आहेत. ज्यांनी बँकेच्या जीवावर आपले व्यवसाय मोठे केले, तेच आता बँकेच्या विरुद्ध बोलत आहेत. आजच्या घडीला बँकेत जी अनिश्चिता झाली आहे ती पूर्ण करणार असल्याचे ते म्हणाले.
विवेक पाटील यांनी परदेशात पळ काढण्यापूर्वी त्यांचा पासपोर्ट जप्त करावा आणि त्यांची अंमलबजावणी संचालनालयामार्फत (ईडी) चौकशी व्हावी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली होती. यावर मी कुठेही पळून जाणार नाही. एकाच वेळी सगळेच खातेदार 500 कोटी रुपये मागायला आले तर कोणत्याही बँकेसाठी हे शक्य नाही. मी स्वतः ठेवीदारांच्या समोर जातो. ठेवीदार माझे आजपर्यंत ऐकत आले आहेत. माझ्यावर ठेवीदारांचा पूर्ण विश्वास आहे. सर्व ठेवीदारांचे पैसे देणे, ही माझी जबाबदारी आहे. मात्र, राजकीय असूडा पोटी मला आणि माझ्या बँकेला काही लोक बदनाम करीत, असल्याचे ते म्हणाले.