ठाणे- उल्हासनगर शहरातील कॅम्प ४ मध्ये एका चहा विक्रेत्याच्या दुकानाचे शटर तोडून चोरी केल्याची घटना समोर आली आहे. मात्र, चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याने पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे काही तासातच आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. सुनील सपकाळे, संजय जाधव, सोनू पानपाटील असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
उल्हासनगरात चोरट्यांनी फोडले चहाचे दुकान; घटना सीसीटीव्हीत कैद - stall
उल्हासनगर शहरात चोऱ्या, घरफोड्यांच्या घटनेत कमालीची वाढ झाल्याचे विविध पोलीस ठाण्यातील नोंदीवरून दिसत आहे. अशाच एका घटनेत शहरात रात्रीच्या वेळी तीन तरुणांनी एका चहाच्या दुकानाचे शटर तोडून चोरी केली आहे.

उल्हासनगर शहरात चोऱ्या, घरफोड्यांच्या घटनेत कमालीची वाढ झाल्याचे विविध पोलीस ठाण्यातील नोंदीवरून दिसत आहे. अशाच एका घटनेत शहरात रात्रीच्या वेळी तीन तरुणांनी एका चहाच्या दुकानाचे शटर तोडून चोरी केली होती. मात्र, या चोरट्यांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली.
याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे काही तासातच चोरटे सुनील सपकाळे, संजय जाधव, सोनू पानपाटील या चोरट्यांचा शोध घेवून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठळी सुनावण्यात आली आहे.