ठाणे :विशेष म्हणजे दरोडेखोरांनी मंदिरातील सीसीटीव्हीचा नवीन डीव्हीआरसह विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीवरील दोन किलो वजनाचे चार चांदीचे मुकुट दरोडेखोरांनी पळवून नेले. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात सहा दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. ठाणेजिल्ह्यातीलकल्याण तालुक्यातील टिटवाळा येथे विख्यात असे महागणपतीचे मंदिर आहे. याच मंदिरा शेजारी विठ्ठल रुखमाईचे मंदिर आहे. ३१ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास दुचाकी वरून आलेल्या सहा दरोडेखोरांनी मंदिराच्या मुख्य प्रवेशदाराचे कुलूप आणि कडी कोयंडा तोडून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीवरील दोन किलो वजनाचे दोन लाख रुपये किंमतीचे चार चांदीचे मुकुट चोरून नेले. शिवाय मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर देखील चोरून नेला आहे. त्यामुळे पोलिसांना तपासात काहीसा अडथळा निर्माण झाला आहे.
नागरिकांमध्ये मोठी दहशत: विशेष म्हणजे मंदिर व्यवस्थापक किरण रोहटे यांनी सांगितले कि, कालच सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा नवीन डीव्हीआर लावण्यात आला होता. तसेच मंदिराच्या परिसरातील ४ घरफोड्या या दरोडेखोरांनी केल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. दोन दुचाकी वरून आलेल्या सहा दरोडेखोरांनी घरफोड्या केल्यानंतर परिसरातील एका सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात ते कैद झाल्याचे समोर आले आहे.