महाराष्ट्र

maharashtra

राज्यात नाट्यगृह आणि चित्रपटगृहे उघडणार; मात्र कर्मचार्‍यांअभावी मालक चिंतेत

By

Published : Nov 5, 2020, 4:31 PM IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यात लॉकडाऊन लावून थिएटर्स, नाट्यगृहे, शाळा बंद करण्यात आले होते. आता अनलॉकच्या पार्श्वभूमीवर हळूहळू अनेक आस्थापनांना परवानगी देण्यात येत आहे. सिनेमा हॉल्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे एकूण क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांसह उद्यापासून सुरू होणार आहेत.

Theatre
नाट्यगृह

ठाणे - कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असलेल्या सगळ्या थिएटर्सना, नाट्यगृहांना आणि मल्टिप्लेक्सना उद्यापासून ५० टक्के क्षमतेने उघडण्याची संमती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच कोरोना प्रतिबंधित क्षेत्र वगळता तरण तलावही उघडण्यास संमती देण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यात लॉकडाऊन लावून थिएटर्स, नाट्यगृहे, शाळा बंद करण्यात आले होते. आता अनलॉकच्या पार्श्वभूमीवर हळूहळू अनेक आस्थापनांना परवानगी देण्यात येत आहे. सिनेमा हॉल्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे एकूण क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांसह उद्यापासून सुरू होणार आहेत. थिएटर्स सुरू करण्यात येणार असले तरीही कोरोना संदर्भातले सुरक्षेचे सगळे नियम अर्थात SOPचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आठ महिन्यांपासून बंद असलेली थिएटर्स, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहाची स्वच्छता व डागडुजीचे काम सुरू करण्यात आले आहे. एकंदरीत या निर्णयामुळे थिएटर्स मालक आणि कलाकार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण थिएटर आणि नाट्यगृह सुरू होण्यास आणखी काही दिवस लागतील.

दरम्यान कर्मचाऱ्यांची कमतरता, रेल्वे वाहतूक करण्यास कर्मचार्‍यांना असणारी मनाई, नाट्यगृह आणि थिएटर सॅनिटाइज करण्यासाठी लागणारा वेळ तसेच गेल्या ६-७ महिन्यात कोणताही चित्रपट किंवा नाटक प्रदर्शित झाले नाही आणि शूटिंगदेखील बंद असल्याने नाट्यगृह आणि चित्रपटगृहांना किती प्रतिसाद मिळेल, याबद्दल नाट्यगृह आणि सिनेमागृह चालक मालकांनी साशंकता व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details