ठाणे - येथील कासारवड़वली भागात बांधकाम सुरू असलेल्या मेट्रोच्या एका खांबावर तरुण चढून बसला होता. यामुळे पोलिसांसह नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. बाळू चव्हाण असे त्या तरुणाचे नाव असून तो मानसिक रुग्ण असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांनी त्या तरुणाला खाली उतरवल्याने पोलिसांसह नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
मेट्रोच्या खांबावर चढून बसला तरुण, पोलिसांसह नागरिकांची धावपळ हेही वाचा -संमोहनाला विज्ञानाच्या परिभाषेत मांडणारे एब्बे फारिया मृत्यूच्या दोनशे वर्षांनंतरही उपेक्षितच
यावेळी मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी सांगूनदेखील तो तरूण खाली उतरत नसल्याने शेवटी आपत्ती व्यवस्थापन विभागाला बोलावण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेवटी त्याला खाली आणले. बाळू चव्हाण असे या व्यक्तीचे नाव असून तो कळवा येथील राहणारा आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो वर चढून का बसला होता याची चौकशी पोलीस करत आहेत. त्या व्यक्तिची मानसिक स्थिती बिघडली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तर याठिकाणी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे याआधी देखील अनेकदा अपघात झालेले आहेत.
हेही वाचा -गोष्ट वायरलेस प्रेमाची, अंकुश चौधरीच्या 'ट्रीपल सीट'चा टीजर प्रदर्शित