महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बैठकीत अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर जलसंपदा मंत्री भडकले; दिला 'हा' इशारा - Gulabrao Patil angry on absent officers

जिल्ह्यातील पाणीपुरावठा योजना आणि त्यांच्या आढव्यासाठी नियोजन भवन येथे आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यात राज्याचे जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील हे बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या आधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. आठवडाभरात त्यांना गुलाबराव समजतील, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला.

minister Gulabrao Patil angry
गुलाबराव पाटील भडकले

By

Published : Feb 4, 2021, 8:29 PM IST

ठाणे -जिल्ह्यातील पाणीपुरावठा योजना आणि त्यांच्या आढव्यासाठी नियोजन भवन येथे आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यात राज्याचे जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील हे बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या आधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. आठवडाभरात त्यांना गुलाबराव समजतील, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला.

माहिती देताना मंत्री गुलाबराव पाटील

हेही वाचा -लागोपाठ दुसऱ्यांदा कुक्कुटपालन व्यवसायिक आर्थिक संकटात

बैठकीला महसूल विभाग, एमआयडीसी, जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ही बैठक सुरू झाल्यावर काही अधिकारी बैठकीला उपस्थित नसल्याचे पाटील यांना समजले व ते संतापले. कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

बाहुली धरण योजनेसाठी 276 कोटी 21 लाख खर्च

येत्या 15 दिवासात बाहुली धरणाचे टेंडर प्रकाशित होणार असून, त्यासाठी 97 गावे आणि 259 पाडे बाधित होणार आहेत. बाहुली धरण योजनेसाठी 276 कोटी 21 लाख खर्च येणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तसेच, जिल्ह्यात प्रलंबित असलेल्या धरणांबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. आवश्यकता असल्यास पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. यावेळी पाटील यांनी अधिकाऱ्याला तू ढब्बू आहेस, तू खाली बस असे चिडून म्हटले.

हेही वाचा -येत्या साडेतीन वर्षांत पूर्ण होईल गोसेखुर्द धरण - जलसंपदा मंत्री

ABOUT THE AUTHOR

...view details