मुंबई :ठाणे जिल्हा हा मुंबई जिल्ह्यानंतर विविध प्रकल्पांच्या नावाने ओळखला जातो. ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये मेट्रो तसेच इतर रस्ते मार्ग रेल्वे मार्ग याचे विविध प्रकल्प तसेच पंचायत राज ग्रामीण विकास याचे देखील अनेक प्रकल्पाचे काम सुरू आहे .परंतु या संदर्भात म्हारळ गाव, तालुका कल्याण या ठिकाणी पैशाचा अपहार आणि भ्रष्टाचार झाल्याबाबत ठाणे जिल्हा परिषदेच्या एका सदस्यानेच आवाज उठवला, आणि तक्रार केली त्यानंतर चौकशी केली गेली.पुढे मात्र लाल फीतीत प्रकरण अडकल्याची तक्रार आहे.
जिल्हा परिषद सदस्य यांनी जी तक्रार केली होती, त्यामध्ये त्यांनी नमूद केले होते की , वरील गावांमध्ये तालुका कल्याण येथे विविध योजना आणि प्रकल्पांच्या कामांमध्ये पैशाची देवघेव झालेली आहे. नियमबाह्य गोष्टी केल्या आहेत. भ्रष्टाचार झालेला आहे. आणि यासंदर्भात चौकशी करावी; अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यानुसार तालुका विकास अधिकारी कल्याण यांनी त्या संदर्भात चौकशी देखील केली.मात्र पुढे कारवाई थांबली.
कल्याण तालुका विकास अधिकारी यांनी यासंदर्भात नियमांतर्गत म्हरळ गावाच्या विविध प्रकल्पांच्या संदर्भात जो भ्रष्टाचार झालेला आहे. त्याबाबत तपास केला. चौकशी झाली, चौकशी मध्ये काही व्यक्ती या दोषी आढळले. परंतु इतके होऊनही कोणतीही अंमलबजावणी केली गेली नाही. चौकशीनंतर त्याबाबत एफ आय आर देखील नोंदवला गेला होता. परंतु ज्यांच्यावर गुन्हे नोंदवले गेलेले आहे त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई मात्र झालेले नाही. म्हणूनच आता त्या संदर्भात ठाणे जिल्हा परिषदेच्या सदस्याने आता कारवाई मध्ये राजकीय वरदहस्त आडवा येत असल्याने प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केले आहे.