ठाणे - अमली पदार्थ विक्री करण्यासाठी कल्याणात आलेल्या एका तस्कराला महात्मा फुले चौक पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. या तस्कराकडून 105 ग्राम वजनाची 2 लाख 10 हजर रुपयांची मेफोड्रॉन क्रिस्टल पावडर हस्तगत केली करण्यात आली. किरण नायक असे या तस्कराचे नाव आहे.
ठाण्यात 2 लाखांच्या अमली पदार्थासह तस्कराला अटक - ठाण्यात अमली पदार्थासह तस्करांना अटक
अमली पदार्थ विक्री करण्यासाठी कल्याणमध्ये आलेल्या एका तस्कराला पोलिसांनी अटक केली. त्याच्या जवळून १०५ ग्रम वजनाची मेफोड्रॉन क्रिस्टल पावडर हस्तगत करण्यात आली.
![ठाण्यात 2 लाखांच्या अमली पदार्थासह तस्कराला अटक The smugglers were arrested after seizing 2 lakh drugs in Thane](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5875238-343-5875238-1580235146450.jpg)
मुंबई येथून एक तरुण अमली पदार्थ विक्री करण्यासाठी कल्याण स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे व त्यांच्या पथकाने कल्याण स्थानक परिसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास सापळा रचला. एक तरुण संशयास्पदरित्या घुटमळताना त्यांना आढळून आला. सहपोलीस निरीक्षक सरोदे व त्यांच्या पथकाने झडप घालून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 105 ग्रॅम वजनाचे 2 लाख 10 हजर रुपयांची मेफोड्रॉन क्रिस्टल पावडर आढळून आली.
चौकशी दरम्यान या तरुणाचे नाव किरण नायक असून तो मुंबईच्या मालाड येथे राहणारा असल्याचे निष्पन्न झाले. महात्मा फुले पोलिसांनी अमली पदार्थ जप्त करत त्याला अटक केली. त्याने हे ड्रग्ज कुठन आणले व कुणाला विकण्यासाठी आणले याचा तपास सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी दिली.