ठाणे - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांनी कोणाला भीक घालू नये, बिनधास्त जावे अशी प्रतिक्रिया मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे. अंबरनाथ शहरात कार्यक्रमाला आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. आता सगळीकडे तिसऱ्या लाटेचे कारण पुढे केले जात आहे. लाटेतून मार्ग काढणारा हा खलाशी असतो. मात्र, इथे खलाशीच घाबरल्याने सगळे असेच बोलणार, अशी टीकाही त्यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता केली आहे.
लाटेतून मार्ग काढणारा हा खलाशी असतो, मात्र इथे खलाशीच घाबरलाय -राजू पाटील - Ganesh
कोकणात जाणाऱ्यांनी कोणाला भीक घालू नये, बिनधास्त जावे अशी प्रतिक्रिया मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे. अंबरनाथ शहरात कार्यक्रमाला आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना ७२ तास आधी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आर.टी.पी.सी.आर चाचणी करावी लागणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी नुकतेच विधान केले. तर, दुसरीकडे कोरोना टेस्टची कोणतीही आवश्यकता नाही, असे आमदार भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यातच आज मनसेचे आमदार राजू पाटील यांनी गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी कोणाला भीक घालू नका. बिंधास्त जा, असे विधान केले आहे. त्यामुळे चांगलीच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे वातावरण आहे.