महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फिरत्या दवाखाण्यामुळे आदिवासी - दुर्गम भागात जलदगतीने वैद्यकीय तपासणी होणार

ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मोबाईल युनिट वाहनांचे दर दिवसाचे नियोजन केले आहे. त्याप्रमाणे वेळापत्रक तयार करून प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या गावात हे युनिट फिरणार असून याची माहिती ग्रामपंचायत मार्फत गावकऱ्यांना देण्यात येणार आहे. छोट्या आजारापासून ते प्रसूतीपर्यंतच्या आणि इतर आजारांवर तपासणी, उपचार यामध्ये केले जाणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेला मिळालेले हे युनिट आरोग्य विभागासाठी वरदान ठरणार आहे.

By

Published : Jun 4, 2021, 9:41 AM IST

मोबाईल मेडिकल युनिट वाहन मोबाईल मेडिकल युनिट वाहन
मोबाईल मेडिकल युनिट वाहन

ठाणे - जिल्हा परिषदेच्या मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील ५५ आदिवासी, दुर्गम आणि डोंगराळ भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा-सुविधा जलद गतीने मिळणार आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सन २०२१-२२ या वर्षाकरिता राज्य शासनाच्या वतीने मोबाईल मेडिकल युनिट वाहन ( फिरता दवाखाना ) जिल्हात उपलब्ध झाले असून ही सेवा १ जून पासून सुरू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे यांनी दिली आहे.

९ प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा-

मोबाईल मेडिकल युनिट वाहन

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागाकरीता फिरता दवाखाना उपलब्ध होण्यासाठी शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आला होता. शासनाने विशेष बाब म्हणून या प्रस्तावाला मान्यता दिली. व तात्काळ ही सेवा सुरू केली आहे. जिल्ह्याच्या दोन तालुक्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात नागरिकांना ही आरोग्य सेवा उपलब्ध झाली असून, प्रा. आ. केंद्र धसई, मोरोशी, शिरोशी, अघई, डोळखांब, कसारा, टेंभा, किन्हवली, शेंद्रुण, टाकीपटार, वाशिंद आदी प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे. या युनिटच्या माध्यमातून ४२ आजारांची तपासणी करणे शक्य असून लसीकरण, माता बाल संगोपन ,आणि कुटुंब कल्याण विषयक आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यासाठी एक डाॅक्टर, एक सिस्टर, एक औषध निर्माण अधिकारी, एक लॅब टेक्नीशियन, दोन वाहनचालक असा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मोबाईल युनिट वाहनांचे नियोजन

ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मोबाईल युनिट वाहनांचे दर दिवसाचे नियोजन केले आहे. त्याप्रमाणे वेळापत्रक तयार करून प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या गावात हे युनिट फिरणार असून याची माहिती ग्रामपंचायत मार्फत गावकऱ्यांना देण्यात येणार आहे. छोट्या आजारापासून ते प्रसूतीपर्यंतच्या आणि इतर आजारांवर तपासणी, उपचार यामध्ये केले जाणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेला मिळालेले हे युनिट आरोग्य विभागासाठी वरदान ठरणार आहे.

हेही वाचा- दिलासादायक नागपुरात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे आकडे झाले एक अंकी

ABOUT THE AUTHOR

...view details