महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काशिमिरा पोलिसांकडून ५२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त - काशिमिरा पोलीसांकडून गुटखा जप्त

वरसावे नाका येथून गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती काशिमिरा पोलिसांना मिळाली होती. यानंतर सापळा रचून पोलिसांनी जीजे २१ डब्ल्यू २६६४ हा आयशर टेम्पो थांबवला. या टेम्पोमध्ये विमल, रजनीगंधा, तुलसी, व्ही-वन सुगंधी तंबाखू, बाबा तंबाखू असा एकूण ५२ लाख ४० हजार रुपये किंमतीचा गुटखा मिळाला.

मीरा भाईंदर गुटखा जप्त बातमी
मीरा भाईंदर गुटखा जप्त बातमी

By

Published : Mar 2, 2021, 6:08 PM IST

मीरा-भाईंदर - काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरसावे नाका येथे ५२ लाख रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. या गुटख्यासह आयशर टेम्पोही ताब्यात घेण्यात आला आहे.

वरसावे नाका येथून गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती काशिमिरा पोलिसांना मिळाली होती. यानंतर सापळा रचून पोलिसांनी जीजे २१ डब्ल्यू २६६४ हा आयशर टेम्पो थांबवला. या टेम्पोमध्ये विमल, रजनीगंधा, तुलसी, व्ही-वन सुगंधी तंबाखू, बाबा तंबाखू असा एकूण ५२ लाख ४० हजार रुपये किंमतीचा गुटखा मिळाला. टेम्पो चालक मोहम्मद अल अमीन जबर खान क्लीनर मोहम्मद जुनेद खान यांना ताब्यात घेऊन १५६/२०२१ भादवि कलम ३२८, १८८, २७२, २७३ सह अन्न व सुरक्षा आणि मानके अधिनियम कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ १ सहाय्यक पोलीस आयुक्त मीरारोड विभाग, काशिमिरा पोलीस ठाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन काशीद, पोलीस उपनिरीक्षक पंकज किजले, बाळू घुगे, राऊत, बाळू आव्हाड, राठोड, उबाळे यांनी केली आहे.

हेही वाचा - सेहवागला शतकापासून रोखणारा आज चालवतोय बस!

ABOUT THE AUTHOR

...view details