ठाणे - डोंबिवली पूर्वेतील महापालिकेच्या जिमखाना कोविड रुग्णालयात विचित्र प्रकार चव्हाट्यावर आला आहे. या रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या एका वृद्ध रुग्ण महिलेच्या गाळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरट्याने लंपास केल्याच्या वृत्ताने रुग्णासह नातेवाईकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिका हद्दीत कोरोनाने बाधित झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ठिकठिकाणी कोविड रुग्णालय उभारण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या रुग्णालयात बाहेरील कोणासही प्रवेश दिला जात नाही. तरीही अशा रुग्णालयातून दुसऱ्यांदा दागिने लंपास झाल्याचा प्रकार समोर आल्याने कोविड रुग्णालयाच्या सुरक्षेते बाबतचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
रेमडेसिवीरच्या इंजेक्शनमुळे गाढ झोप लागली अन...
संबंधित रुग्ण महिला कल्याण पश्चिम परिसरातील खडकपाडा भागात राहते. त्यांना 1 डिसेंबरपूर्वी कोरोनाचे निदान झाल्याने त्यांना उपचारासाठी डोंबिवलीतील कोविड जिमखाना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना येथील डॉक्टरांनी त्यांना 1 डिसेंबरच्या रात्री रेमडेसिवीरचे इंजेक्शन दिले. त्यामुळे त्यांना गाढ झोप लागली होती. याचाच फायदा घेऊन रुग्णालयातील अज्ञताने त्यांच्या गळ्यातील 33 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र लंपास केले. विशेष कोविड रुग्णालयात बाधीत रुग्णांवर उपचार होत असल्याने तेथे डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, सफाई कामगाऱ्यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणालाही प्रवेश देण्यात येत नाही. अतिदक्षता विभागात सुरक्षेच्या कारणामुळे इतर कोणालाही जाण्याची परवानगी नाही. उपचार घेत असलेली महिला कोरोनामुक्त होऊन घरी परतली. मात्र, तिच्या गळ्यातील मंगळसूत्र नसल्याचे निदर्शनास येताच महिलेच्या मुलाने टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
यापूर्वीही घडली अशी घटना