ठाणे The in laws killed woman : पतीसह सासरच्या मंडळीनी विवाहितेचा छळ करून तिच्यावर बंदुकीतून गोळीबार करत तिला ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शहापूर तालुक्यातील अजनुप ग्रामपंचायत हद्दीतील बोंडरपाडा येथील मृतक सासरी राहत असलेल्या घरात घडली आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या सहा जणांच्या विरोधात हत्येसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. रंजना शिवा भवर (वय २७) असे गोळीबारात ठार झालेल्या विवाहितेचं नाव आहे. तर पती शिवा भवर, सासू सावित्री भवर, सासरे काळू भवर, गजमल भवर, आत्या भवर, बेंडू भवर अशी गुन्हा दाखल झालेल्या सासरच्या सहा जणांची नावे आहेत.
मारहाण आणि शिवीगाळ -मिळालेल्या माहितीनुसार मृतक रंजना शहापूर तालुक्यातील नांदगाव चिंचपाडा येथे राहणारी होती. तिचा विवाह शहापूर तालुक्यातील अजनुप ग्रामपंचायत हद्दीतील बोंडरपाडा येथील शिवा भवर याच्याशी २८ एप्रिल २०१८ रोजी झाला. त्यानंतर वर्षभर सुखाचा संसार सुरू असतानाच आरोपी पती हा मृतक पत्नीला घर खर्चासाठी पैसे माहेरुन घेऊन ये असा असा तगादा लावत तिला मारहाण आणि शिवीगाळ करत होता. त्यातच विवाह झाल्यानंतर दोघांना दोन मुले झाली असून एक मुलगी साडेतीन वर्षाची आहे. तर मुलगा दीडवर्षाचा आहे. अशातच सासरची मंडळी अधिक छळ करीत असल्याने मृतक रंजनाने २०२२ मध्ये विष घेतलं होतं. मात्र त्यावेळी तिच्यावर तातडीनं उपचार केल्याने ती बरी झाली होती. त्यानंतर दोन मुलांना घेऊन ती माहेरी राहात होती. त्यानंतर सासरच्या मंडळींनी तिला पुन्हा समजूत काढून सासरी आणले होते.