ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयातील उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या कार्यालयात शिरून एका नागरिकाने अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच त्यांना धमकावण्याचाही प्रकार समोर आल्याने पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.
कल्याण-डोंबिवलीच्या महिला उपमहापौरांना मुख्यालयात शिरुन अश्लील शिवीगाळ; एकास अटक - उपेक्षा भोईर
भाजपच्या उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या कार्यालयात शिरून एका नागरिकाने अशील भाषेत शिवीगाळ केली .याप्रकरणी बाजारपेठ पोलीसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.
भाजपच्या उपमहापौर उपेक्षा भोईर या मांडा प्रभागातील आहे. आरोपी उमेश साळुंके याने सोसायटीच्या रस्त्यावर अनधिकृत खोल्या व कार्यालयाचे बांधकाम केले आहे. याबाबत सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी पालिकेच्या 'अ' प्रभाग अधिकार्याकडे तक्रार दाखल केली होती. मात्र कारवाई करूनही पालिकेच्या अनाधिकृत नियंत्रण विभागाकडून कारवाई करण्यात आली नाही. यामुळे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपेक्षा भोईर यांनी महासभेच्या पटलावर लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याचा राग आल्याने उमेश थेट महापालिका मुख्यालयात पोहोचला आणि उपमहापौरांना लक्षवेधी मांडल्याबद्दल जाब विचारला .
दरम्यान दोघांमध्ये वाद झाला. आरोपी साळुंके याने त्यांना अश्लील शिवीगाळ करून धमकी दिली असल्याची तक्रार उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात दिली. त्यांच्या तक्रारीनुसार बाजारपेठ पोलिसांनी साळुंके यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करित त्याला अटक केली आहे.