ठाणे:उल्हासनगर मधील लाईफ केअर या खाजगी रुग्णालयात (Life Care Hospital) एक नर्स तीन वर्षांपासून कार्यरत आहे. त्यात रुग्णालय व्यवस्थापकाने तिला ४ एप्रिल पासून रजा दिली होती. नंतर १० एप्रिल रोजी नर्सला सुपारी देणारे डॉ.शहाबुद्दीन यांनी फोन करुन तिला रुग्णालयात बोलावले. त्यानुसार ती नर्स रुग्णालयाकडे निघाली असता रस्त्यात अनोळखी चोरट्याने तिचा मोबाईल खेचून पळ काढला. या प्रकरणी तिने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात (Central Police Thane) तक्रार दाखल केली.
दिली १० हजार रुपयांची सुपारी:पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे आरोपी अरशद अबू कलाम खान याला ताब्यात घेतले, त्याने आरोपी मोहम्मद आरिफ सराजुद्दीन खान याच्या सांगण्यावरून मोबाईल पळविण्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांना दिली. या आधारावर १४ एप्रिल रोजी मोहम्मद याला अटक करण्यात आली. अटकेतील आरोपींच्या चौकशीत डॉ.शहाबुद्दीनचे नाव पुढे आले. खळबळजनक बाब म्हणजे डॉ.शहाबुद्दीन यांनेच त्या नर्सचा मोबाईल पळविण्यासाठी १० हजार रुपयांची सुपारी दिली होती.