महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आदिवासी मुलीचा मृतदेह तब्बल 9 दिवसानंतर शवचिकित्सेसाठी काढला उकरून - आदिवासी विद्यार्थिनी आत्महत्या प्रकरण ठाणे़

शहापूर तालुक्यातील कुल्हे शासकीय आश्रम शाळेतील दहावीत शिकणाऱ्या अंजली गुरुनाथ पारधी (वय 16 रा. रास) या आदिवासी विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना 11 सप्टेंबर घडली होती. तिच्या कुटुंबीयांनी तिचा मृतदेह जमिनीत पुरून परस्पर अंत्यसंस्कार केले. मात्र,  ही घटना आश्रम शाळा प्रशासनाला तसेच पोलिसांनाही कळविण्यात आली नव्हती. आत्महत्येच्या प्रकरणाने संशय निर्माण झाल्याने तिचा पुरलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी जमिनी बाहेर काढण्यात आला आहे.

आदिवासी मुलीचा मृतदेह तब्बल 9 दिवसानंतर शवचिकित्सेसाठी काढला उकरून

By

Published : Sep 20, 2019, 8:54 PM IST

Updated : Sep 20, 2019, 10:07 PM IST

ठाणे - शहापूर तालुक्यातील कुल्हे शासकीय आश्रम शाळेतील दहावीत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना 11 सप्टेंबर घडली होती. त्यानंतर तब्बल नऊ दिवसांनंतर या मुलीचा जमिनीत पुरलेला मृतदेह चौकशीसाठी बोहेर काढण्यात आला आहे. अंजली गुरुनाथ पारधी (वय 16 रा. रास) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

हेही वाचा -ठाण्यात कंटेनर चढला दुभाजकावर; वाहनांच्या लांबच लांब रांगा

अंजली गणपती उत्सवासाठी गावी गेली होती. तिथे तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. खळबळजनक बाब म्हणजे, तिच्या कुटुंबीयांनी तिचा मृतदेह जमिनीत पुरून परस्पर अंत्यसंस्कार केले. मात्र, ही घटना आश्रम शाळा प्रशासनाला तसेच पोलिसांनाही कळविण्यात आली नव्हती. गणपती उत्सवाची सुट्टी संपल्यानंतर अंजली नियमित शाळेत आली नसल्याने शाळा प्रशासनाने चौकशी केल्यानंतर तिने आत्महत्या केल्याची घटना तब्बल नऊ दिवसानंतर उघडकीस आली. या आत्महत्येच्या प्रकरणाने संशय निर्माण झाल्याने तिचा पुरलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी जमिनीबाहेर काढण्यात आला आहे. संपूर्ण प्रकरणाची वाशिंद पोलिसांमार्फत चौकशी सुरू झाली आहे. शवविच्छेदनाचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर या आत्महत्या प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, गेल्या चार वर्षात शहापूर तालुक्यातील विविध आश्रमशाळांमध्ये आत्तापर्यंत तब्बल दहा विद्यार्थ्यांचा मृत्यू, आत्महत्या तसेच इतर अपघाती कारणांमुळे झाला आहे. ही आकडेवारी पाहता आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Last Updated : Sep 20, 2019, 10:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details