ठाणे - एका २० वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करून मृतदेह गोणी भरला. धक्कादायक बाब म्हणजे मृतदेहाला दगडाने बांधून गोणीत भरललेल्या अवस्थेत तलावात आढळून आला. ( Brutal Killing Youth In Thane District ) ही घटना अंबरनाथ पश्चिमेच्या जावसई गावातील आयप्पा मंदिराच्या तलावात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात हत्येसह पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला. तर अंबरनाथ शहरात पुन्हा एका तरुणाच्या हत्येने खळबळ उडाली आहे. विशाल राजभर ( २०, रा. हनुमाननगर, उल्हासनगर) असे निर्घृण हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मृतदेहाच्या मानेला, पायाला मोठ मोठाले दगड बांधून फेकले तलावात - मृत विशाल हा उल्हासनगर कॅम्प नंबर २ मधील हनुमाननगर भागात राहणारा होता. काल (४ जुलै) रोजी सायंकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह अंबरनाथ पश्चिमेच्या जावसई गावातील आयप्पा मंदिराच्या तलावात असलेल्या एका गोणीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने त्याचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. त्यावेळी त्याच्या मृतदेहाच्या डोक्यावर आणि शरीराच्या इतर ठिकाणी तीक्ष्ण हत्यारांनी वार केलेले पोलिसांना आढळून आले. ( 20-Year-Old Youth Was Killing ) कोणीतरी अज्ञात आरोपीने त्याची हत्या करून त्याचा मृतदेह तीन-चार दिवसापूर्वी गोणीत बांधून मृतदेहाच्या मानेला, पायाला मोठ मोठाले दगड बांधून मृतदेह आयप्पा मंदिराच्या तलावात फेकून देण्यात आल्याचा कयास पोलिसांनी व्यक्त केला. दुसरीकडे हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने भयानक कृत्य केले असावे असा अंदाज पोलिसांनी वर्तवली आहे.