मुंबई :फेब्रुवारी महिन्यात काळाचौकी परिसरात असलेल्या अभ्युदयनगर येथील चाळीत घरफोड्या झाल्या होत्या. या प्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपीचा आग्रीपाडा पोलिसांकडून काही दिवसांपूर्वी ताबा घेतला होता. आरोपीचे नाव कृष्णा महेशकर असे असून त्याने लघुशंकेसाठी केलेला असताना काळाचौकी पोलीस ठाण्यातील बाथरूममध्ये असलेल्या फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या आरोपीला तात्काळ केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर तब्येत सुधारली असून आरोपीला चौकशीनंतर आर्थर रोड तुरुंगात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
मारहाण केल्याने आत्महत्येचा प्रयत्न :मात्र, आरोपीला चौकशी दरम्यान तपास अधिकाऱ्याने मारहाण केल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला का असे विचारले असता पोलीस उपायुक्त मुंढे यांनी आरोपी हॅबिच्युअल गुन्हेगार असून त्याने यापूर्वी देखील असेच आत्महत्येचे प्रयत्न केले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणाची अधिक चौकशी आम्ही करत असल्याची माहिती देखील त्यांनी पुढे दिली आहे. मात्र पोलीस ठाण्यात आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ माजली आहे. काळाचौकी पोलीस ठाण्यातील शौचालयात फिनाईलची बाटली आलीच कशी?, जर आरोपींना या शौचालयात जाण्याची परवानगी दिली जाते तर अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे यापुढे तरी काळाचौकी पोलीस ठाणे असे प्रकार टाळणार का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.