ठाणे - वन्यप्राण्यांच्या कातडीची तस्करी करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली. समीर जाधव, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वन्यप्राण्यांच्या कातडीची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक, ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त - ठाणे
शहरातील बाळकुम माजीवडा परिसरात एक तस्कर येणार असल्याची गुप्त माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून त्या आरोपीला अटक केली.

अटक केलेला आरोपी
कारवाईबद्दल माहिती देताना पोलीस उपायुक्त दिपक देवराज
शहरातील बाळकुम माजीवडा परिसरात एक तस्कर येणार असल्याची गुप्त माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून त्या आरोपीला अटक केली. त्याच्याकडून वाघ, बिबट आणि मगरीचे कातडे तसेच हत्तीचे २ दात असा एकूण ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच कापुरबावडी पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने वन्यप्राण्यांची कातडी कुठून आणली होती? यासंदर्भातील तपास ठाणे गुन्हे शाखा करीत आहे.