ठाणे: येत्या काही दिवसात ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूका (thane municipal election) होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाणेकरांना दिवाळीनिमित्त राजकीय शिधा (shidha) घरोघरी पोहोचवल्या जात आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde shidha) यांच्यामार्फत ठाण्यातील सर्वच नागरिकांना या शिध्याचं वाटप होत आहे. मुख्य म्हणजे प्रत्येक शिधे वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो असलेले पिशवी आहे.
सरकारी शिधा अद्याप राशन दुकानांवरती नाही: ठाण्यातील विविध भागातील शाखांमध्ये हा उपक्रम राबवला जात असून प्रत्येक शाखांच्या माध्यमातून हा शिधा घरोघरी कसा पोहोचला जाईल याकडे जातीने लक्ष दिले जात आहे. मात्र सरकारने पाठवलेला शिधा अद्यापही राशन दुकानावरती न आल्याने गोरगरीब जनता चिंतेत आहे. मुख्यमंत्र्यांसाठी शिधावाटप हा राजकीय विषय आहे मात्र त्यामुळे गोरगरिबांसाठी सरकारकडून येणारा शिधा याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यावरून आता सवाल देखील विचारले जात आहेत. मात्र दरवर्षीच दिवाळीला प्रत्येक विभागांमध्ये एकनाथ शिंदे यांच्यामार्फत हा शिधा वाटला जातो, असं त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.
ठाण्यातील सर्वच नागरिकांना या शिध्याचं वाटप शंभर रुपयांचा किट अजूनही गायब:राज्यातील गोरगरीब जनतेसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या 100 रुपयाच्या रेशनिंगच्या किट अजूनही सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. साखर, रवा, तेल व चणाडाळ या चार वस्तू पोहोचल्यानंतरच या किट्स वितरीत होणार आहेत. मात्र यापैकी अनेक वस्तू अजूनही रेशनच्या दुकानात पोहोचणे बाकी आहे. त्यामुळे जेव्हा या चारही वस्तू पोहोचतील तेव्हाच या किट्स वाटप रेशनिंग दुकानदार करू शकणार आहेत. आता ह्या किट देण्यासाठी दिवाळी नंतरंच मुहूर्त लागतो की काय असे चिन्ह दिसत आहेत.
ठाण्यातील सर्वच नागरिकांना या शिध्याचं वाटप 100 रुपयात मिळणार आवश्यक खाद्यान्न -राज्य सरकारने सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्याच्या दृष्टीने शिधापत्रिका धारकांना शंभर रुपयांत किट वाटपाचा निर्णय घेतला आहे. या किट मध्ये प्रती १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल यांचा समावेश असणार आहे. राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे 7 कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. यासाठी एक महिन्याच्या कालावधी दिला होता व त्याचे वितरण ई-पास प्रणालीद्वारे केले जाणार होते. यासाठी एकूण ४८६ कोटी ९४ लाख रुपयांच्या खर्चास देखील मान्यता दिली होती.