ठाणे :लोकल रेल्वे आणि बस सेवा अपुरी पडत असल्यामुळे पर्यायी वाहतूक व्यवस्था म्हणून केंद्र सरकारने सर्वच मोठ्या शहरांमध्ये मेट्रोची सेवा सुरू केली. मात्र हजारो कोटींचा खर्च असलेला मुंबईची मेट्रो अस्तित्वात आणण्यासाठी राज्य सरकारने ग्राहकांना स्टॅम्प ड्युटीसोबत 1 टक्का मेट्रो सेस लावण्यात आला. यातून निधी उभारला जाणार होता. एमएमआरडीए क्षेत्रात मेट्रोचे काम काही ठिकाणी अंतिम टप्प्यावर आले (Thanekar On Surcharge Of Metro) आहे. तर काही ठिकाणी सुरू झाले आहे. आता हे काम ज्या महापालिका क्षेत्रात सुरू आहे, त्याठिकाणी हा 1 टक्का सेस लावण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात ज्या नागरिकांना प्रवासासाठी मेट्रोचा फायदा होणार नाही, अशा ठिकाणच्या ग्राहकांनाही सेसचा भार सोसावा लागत आहे. आत्ताच्या सध्याच्या घडीला मेट्रोचा फायदा नसला तरी काही महानगरपालिकांमध्ये नागरिकांना हा एक टक्क्याचा भुर्दंड सोसावा लागतोय, अशी प्रतिक्रिया जाणकारांनी वक्त केली आहे.
मेट्रो सेल्स लावण्याचे आदेश :राज्य सरकारने ज्या महानगरपालिकेत क्षेत्रामधून मेट्रो जात (Surcharge Of Metro) आहे. त्या सर्व महानगरपालिकांमध्ये एक टक्का मेट्रो सेल्स लावण्याचे आदेश दिले आहेत. परंतु महानगरपालिका क्षेत्रामधल्या सर्वच परिसरांमधून मेट्रो जात नाही. त्यामुळे एमएमआरडीए क्षेत्रात अशीही शहरे आहेत. ज्यांना या मेट्रोचा लाभ मिळणार नाही, मात्र प्रत्यक्षात महानगरपालिका क्षेत्रात येत असल्यामुळे त्यांना देखील या मेट्रोचा सेस भरावा लागत (1 percent Surcharge of metro ) आहे.