महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CM Eknath Shinde : ठाण्यात उद्धव ठाकरेंना 'धक्के पे धक्का'; झेडपीच्या अध्यक्षासह १५० नगरसेवक शिंदे गटात सामील

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर महापालिका आणि अंबरनाथ नगरपरिषदेच्या १५० च्या आसपास नगरसेवकांनी शिंदे गटाला ( Thane 150 Councilor joined Shinde group ) पाठिंबा दिला आहे.

Thane 150 Councilor joined Shinde group
ठाण्यात उद्धव ठाकरेंना 'धक्के पे धक्का'

By

Published : Jul 16, 2022, 7:44 PM IST

ठाणे - शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde News ) यांना ठाणे जिल्ह्यातून मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढतो आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर महापालिका आणि अंबरनाथ नगरपरिषदेच्या १५० च्या आसपास नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला ( Thane 150 Councilor joined Shinde group ) आहे. आज (शनिवार) ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि शहरप्रमुख वामन म्हात्रे, पंचायत समितीचे बाळाराम कांबरी यांच्यासह कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे सर्वच २४ माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. त्यामुळे ठाणे जिल्हा ग्रामीण भागासह शहरी भागात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदे गटाकडून धक्के पे धक्का तंत्र वापरून जिल्हातील शिवसेना काबीज केल्याचे दिसून आले आहे.

सर्वच माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट - कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नगरसेवकांनी आतापर्यंत आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. यातील काही ज्येष्ठ नगरसेवकांनी सुरुवातीला मातोश्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत चर्चा केली होती. शनिवारी मात्र कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या सर्वच माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना आपला पाठिंबा दर्शवला. यावेळी शिवसेनेचे सर्व माजी नगरसेवक आणि स्विकृत नगरसेवक उपस्थित होते, अशी माहिती शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी दिली आहे. शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. तर एका माजी नगरसेवकाचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे शहरातील माजी नगरसेवकांची संख्या २५ वरून २३ वर आली होती. त्यातच शिवसेनेचे माजी गट नेते श्रीधर पाटील यावेळी उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त झाले. मात्र गटनेते श्रीधर पाटील यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती वामन म्हात्रे यांनी दिली आहे.

बदलापूर शहरात शिवसेनेत एकही माजी नगरसेवक उरलेला नाही - कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नगरसेवकांसह ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पुष्पा पाटील, अंबरनाथ पंचायत समितीचे बाळाराम कांबरी त्यांचे इतर सहकारी आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शिवसेनेत असलेल्या सर्वच माजी नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा देण्यामुळे बदलापूर शहरात शिवसेनेत एकही माजी नगरसेवक उरलेला नाही. बदलापूर शहर ठाणे जिल्ह्यातील सर्वांनीच पाठिंबा देणारे एकमेव शहर ठरले आहे.

उल्हासनगरातील २५ पैकी १५ नगरसेवक शिंदे गटात -उल्हासनगर महापालिकेवर सर्वाधिक शिवसेनेचा महापौर राहिला असून अशा औद्योगिक शहरावर वर्चस्व राहण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांचा गट सक्रीय झाला आहे. अरुण अशान यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक लिलाबाई अशान, स्वप्नील बागुल, पुष्पा बागुल, राजेंद्र भुल्लर महाराज, महाराणी भुल्लर, कुलवंतसिंग बुटतो, संदीप सुर्वे, विजय पाटील, मीनाक्षी पाटील, आकाश पाटील, विकास पाटील, शुभांगी बेहेनवाल, सुरेश जाधव असे १५ नगरसेवक शिंदे गटात आल्याची महिती अरुण अशान दिली. तर अन्य जण संपर्कात असून ते केव्हाही मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबत येणार असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा -60 वर्षाचा मजनू, 35 वर्षाची लैला.. पडले प्रेमात.. नको त्या अवस्थेत पाहताच गावकऱ्यांनी दिला बेदम चोप

ABOUT THE AUTHOR

...view details