ठाणे - विविध घरकुल योजनांना गतिमान करण्यासाठी शासनाने २० नोव्हेंबर, २०२० ते ५ जून, २०२१ या कालावधीत राबविलेल्या महाआवास अभियानात ठाणे जिल्हा परिषदेने कोकण विभागात अव्वल कामगिरी करत प्रधानमंत्री आवास योजनेत प्रथम क्रमांक तर राज्य पुरस्कृत घरकुल योजनेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. विभागीय आयुक्त, कोकण यांच्या शुभहस्ते ३ सप्टेंबर, २०२१ रोजी कोकण भवन येथे पुरस्काराचे वितरण होणार आहे.
एकूण ९ हजार ३७६ घरकुल पूर्ण
सर्वांसाठी घरे २०२२ हे केंद्र शासनाचे महत्वाचे धोरण असून त्याअनुषंगाने राज्य शासनाने देखील या धोरणाचा स्वीकार केलेला आहे. त्यासाठी केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांना गतिमान करून गुणवत्तावाढीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हातील मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ,कल्याण, शहापूर आदी तालुक्यात महाआवास अभियान राबविण्यात आले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये ६ हजार १८८ घरकुल पूर्ण करण्यात आली. यापैकी अभियान काळात ६४५ घरकुल पूर्ण करण्यात आली तर राज्य पुरस्कृत घरकुल योजनेमध्ये ३ हजार १८८ घरकुले पूर्ण करण्यात आली असून अभियान कालावधीमध्ये ४१२ घरकुले पूर्ण करण्यात आली. म्हणजे एकूण ९ हजार ३७६ घरकुल पूर्ण करण्यात आल्याचे प्रकल्प संचालक दादाभाऊ गुंजाळ यांनी सांगितले.
डेमो हाऊस आणि घरकुल मार्टची उभारणी