ठाणे -काँग्रेस नेते राहुल गांधींना आज (गुरुवारी) पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणाची निषेध व्यक्त करत ठाणे जिल्हा युवक काँग्रेस कमिटीतर्फे निषेध करत राष्ट्रीय महामार्ग ठाणे कोपरी पुलावर आंंदोलन करण्यात आले. तसेच शहर युवक काँग्रेस अध्यक्ष आशिष गिरी यांच्यासह कार्यकर्त्यांनी हा महामार्ग काही काळ रोखून धरला होता.
राहुल गांधींना धक्काबुक्की प्रकरणाचा ठाणे युवक काँग्रेसने केला निषेध - राहुल गांधी धक्काबुक्की प्रकरण ठाणे निषेध
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तरप्रदेश पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाचा ठाणे युवक काँग्रेसने निषेध व्यक्त करत आंदोलन केले. यावेळी ठाणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष आशिष गिरी यांच्यासह कार्यकर्त्यांनी हा महामार्ग काही काळ रोखून धरला होता. यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या तरुणीचा मंगळवारी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी जात असताना यूपी पोलिसांनी त्यांना रस्त्यातच अडवले. तसेच त्यांना धक्काबुक्की केली. याचाच सर्व स्तरांतून निषेध व्यक्त होत आहे. ठाण्यातही जिल्हा युवक काँग्रेस कमिटीतर्फे राष्ट्रीय महामार्ग ठाणे कोपरी पुलावर आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष आशिष गिरी यांच्यासह कार्यकर्त्यांनी हा महामार्ग काही काळ रोखून धरला होता. यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
दरम्यान, आंदोलन झाल्यावर पोलिसांनी कार्यकर्त्यांना नोटीस दिल्या आणि मग त्यांची सुटका झाली.