महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सेना-भाजप विरोधात ठाण्यातील महिला मतदाराची याचिका दाखल; जनतेची फसवणूक केल्याचा आरोप

सेना-भाजप यांनी युती करून या निवडणुका लढवल्या. मात्र आता, सत्तेच्या हव्यासापोटी फारकत घेतली. जनतेने युतीला दिलेल्या कौलाचा हा अपमान असून या दोन्ही पक्षांनी जनतेची फसवणूक केल्याचा दावा प्रिया शशिकांत कुलकर्णी यांनी याचिकेत केला आहे.

प्रिया शशिकांत कुलकर्णी

By

Published : Nov 25, 2019, 11:21 PM IST

ठाणे -महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा खेळ दिवसेंदिवस अधिक नाट्यमय होत आहे. याचे पडसाद आता सामान्य जनतेतही उमटू लागले आहेत. प्रिया शशिकांत कुलकर्णी या महिलेने शिवसेना आणि भाजप या पक्षांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

प्रिया शशिकांत कुलकर्णी

हेही वाचा -'काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती करू नका'; शिवसैनिक चढला टॉवरवर

सेना-भाजप यांनी युती करून या निवडणुका लढवल्या. मात्र आता, सत्तेच्या हव्यासापोटी फारकत घेतली. जनतेने युतीला दिलेल्या कौलाचा हा अपमान असून या दोन्ही पक्षांनी जनतेची फसवणूक केल्याचा दावा त्यांनी या याचिकेत केला आहे. दरम्यान, मतदरांची फसवणूक केल्याबद्दल सेना आणि भाजपवर लवकरात लवकर गुन्हा दाखल व्हावा, असे मत कुलकर्णी यानी वक्त केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details