ठाणे : शहरातील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन आतापर्यंत अनेक पूल उभारण्यात आले. यामध्ये एमएसआरटीसी आणि महानगरपालिका यांच्या मदतीने हे पूल उभे राहिले आहे. ठाणे शहरात आता सध्याच्या स्थितीला अस्तित्वात असलेला पश्चिमेचा सेटीस मीनाताई चौकातील पूल, माजीवाडा जंक्शन पूल, कोपरी नौपाडा पूल, तीन हात नाकापूर खारेगाव पूल, मानपाडा पूल, वाघबीळ पूल मुंब्रा पूल तसेच कळव्याचे दोन पूल असे पूल अस्तित्वात आहेत. आता या सर्व पुलांच्या मालिकेमध्ये नव्याने बनवण्यात येणारे काही पूल समाविष्ट होणार आहेत. यामुळे तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहराला आता पुलांचे शहर अशी नव्याने ओळख मिळणार आहे. (Thane Bridges City)
ठाण्यात काय होणार बदल? : ठाणे महानगरपालिकेची हद्द वाढून उल्हास नदी देखील ठाण्यामध्ये येण्याची चिन्ह आहेत. या नदीवर ती नव्याने पूल उभारण्यात येणार असून आनंदनगर ते गायमुख असा फ्री वे देखील उभारला जाणार आहे. यासोबत सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या तीन हात नाका पुलाला दोन आणखीन कर्वा असलेले पूल नव्याने मिळणार आहेत. गायमुख कावेसर आणखी एक असे नव्याने पुल उभारले जाणार आहे. त्यासोबत वागळे इस्टेट, आयटी हब झाल्याने तेथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नव्याने पुल उभारला जाणार आहे.