महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाणे : नवीन आदेश प्राप्त न झाल्याने भाजी मार्केट सुरूच - Thane District Latest News

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतच भाजी व फळ मार्केट तसेच किराणा दुकाने सुरू ठेवावीत, असा आदेश प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आला आहे. मात्र आज ठाण्यातील सर्व मार्केट ठरवून दिलेल्या वेळेनंतर देखील चालू होती. प्रशासनाचा आदेश आम्हाला आजून मिळाला नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

नवीन आदेश प्राप्त न झाल्याने भाजी मार्केट सुरूच
नवीन आदेश प्राप्त न झाल्याने भाजी मार्केट सुरूच

By

Published : Apr 20, 2021, 4:50 PM IST

ठाणे -कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतच भाजी व फळ मार्केट तसेच किराणा दुकाने सुरू ठेवावीत, असा आदेश प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आला आहे. मात्र आज ठाण्यातील सर्व मार्केट ठरवून दिलेल्या वेळेनंतर देखील चालू होती. प्रशासनाचा आदेश आम्हाला आजून मिळाला नाही, प्रशासनाचा आदेश मिळाल्यानंतर आम्ही आदेशाप्रमाणे दुकाने सुरू ठेवू असे यावेळी दुकानदारांनी सांगितले. दरम्यान कोरोनाचे नियम पाळत आज मार्केटमध्ये सर्व व्यवहार सुरू असल्याचे पाहायला मिळाले.

नवीन आदेश प्राप्त न झाल्याने भाजी मार्केट सुरूच

मार्केट दुसरीकडे हलवण्यास विरोध

मासुंदा तलाव परिसरात भरत असलेल्या भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टेन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे पाहायला मिळत आहे. हे रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने मार्केट हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र मार्केट दुसरीकडे हलवायला व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे.

हेही वाचा -रेमडेसिवीरवरून राजकारण तापले! भाजप-महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

ABOUT THE AUTHOR

...view details