महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाणे वाहतूक पोलिसांच्या कारवाईत 11 महिन्यात दोन कोटींचा दंड वसूल - ठाणे वाहतूक पोलीस दंड वसूली बातमी

ठाणे पोलीस आयुक्तालयात वाहतूक पोलीस यंत्रणा हायटेक झाल्यापासून कोणताही वाद उद्भवत नाही. शिवाय कारवाईचा पुरावा देखील उपलब्ध असतो. त्यामुळे वाद टळल्याने सरकारी कामात अडथळे आणल्याचे गुन्हे देखील कमी होत आहेत.

thane-traffic-police
ठाणे वाहतूक पोलीस

By

Published : Dec 21, 2019, 10:46 PM IST

Updated : Dec 21, 2019, 10:57 PM IST

ठाणे-वाहतूक पोलिसांची यंत्रणा हायटेक झाली. त्यानंतर बेशिस्त वाहन चालकांवर केलेल्या कारवाईत कोणताही वाद न घातला कारवाई होत आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयात 11 महिन्यांत 7 लाख वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक शाखेच्या उत्पन्नात वाढ देखील झाली आहे. या कारवाईमुळे भ्रष्टाचार देखील कमी झाला असून कारवाई झालेल्या वाहनचालकांना घरबसल्या सारथी अ‌ॅपवरुन ऑनलाईन दंड भरता येत आहे.

हेही वाचा-दिशा प्रकरण: गोळीबारात ठार झालेल्या चार आरोपींचे शवविच्छेदन पुन्हा करा, तेलंगाणा उच्च न्यायालय

ठाणे पोलीस आयुक्तालयात वाहतूक पोलीस यंत्रणा हायटेक झाल्यापासून कोणताही वाद उद्भवत नाही. शिवाय कारवाईचा पुरावा देखील उपलब्ध असतो. त्यामुळे वाद टळल्याने सरकारी कामात अडथळे आणल्याचे गुन्हे देखील कमी होत आहेत. ठाण्यात मागील अकरा महिन्यात वाहतूक पोलिसांनी 7 लाख 27 हजार 330 वाहनांवर कारवाई केली. यात आठ कोटी 2 लाख 94 हजारांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाई नो पार्किंगची झाली आहे. रोडपार्किंग मध्ये 73 हजार 155 वाहनांवर कारवाई केली आहे. तर 49 हजार 314 वाहनांवर विना हेल्मेटसाठी कारवाई करण्यात आली आहे.


या कारवाईमुळे नो पार्किंगची समस्या समोर आली असून सर्वात जास्त दंड नो पार्किंगमध्ये वाहन उभे केल्याचे आहेत. यामुळे वाहन चालकांनी देखील आधी सुविधा द्या आणि मग कारवाई करा, अशी मागणी सुरू केली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयात नियोजित शहरे येत नसल्यामुळे पार्किंगचा अभाव दिसतो आहे. त्यासोबत दुचाकीस्वार हेल्मेट सक्ती नंतरही हेल्मेट वापरत नसल्याचे दिसून येत आहे. या दोन्ही समस्या सोडवण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे.

Last Updated : Dec 21, 2019, 10:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details