महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 3, 2019, 6:20 PM IST

ETV Bharat / state

सायन कुर्ला स्थानकात पाणी; मध्य रेल्वेची ठाणे ते मुंबई वाहतूक ठप्प

येत्या काही तासात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक असले तरच घराबाहेर पडण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.

सायन कुर्ला स्थानकात पाणी; मध्य रेल्वेची ठाणे ते मुंबई वाहतूक ठप्प

ठाणे- सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुलूंड, सायन, कुर्ला दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून या रुळावरील ठाण्याहून मुंबईला जाणाऱ्या लोकल काही काळ बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रवासी ठाणे ते मुलूंड रेल्वे रुळांवरून चालत जात आहेत.

सायन कुर्ला स्थानकात पाणी; मध्य रेल्वेची ठाणे ते मुंबई वाहतूक ठप्प

ठाणे ते कसारा आणि ठाणे ते कर्जत अशी लोकल सेवा मध्य रेल्वेने सुरू ठेवली आहे. त्यामुळे प्रवाशांना काही अंशी दिलासा मिळत आहे. येत्या काही तासात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक असले तरच घराबाहेर पडण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.

आज सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या चाकरमान्यांना घरी परतण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक प्रवासी लोकलची वाट बघत ताटकळत उभे आहेत. मात्र, रेल्वे सेवा बंद असल्याने प्रवाशांमध्ये संतपाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details