महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोशल मीडियावरील टिकेनंतर सर्वांवरच गुन्हे दाखल करणार का, न्यायालयाचा सवाल - Thane Session Court

सोशल मीडियावर टिका केल्यानंतर प्रत्येक पोस्टवर गुन्हा दाखल करत बसणार का, असा सवाल विचारण्याची वेळ आली आहे. केतकी चितळे प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर जामिनाच्या सुनावनीवेळी न्यायालायने निरीक्षण नोंदविले आहे. न्यायालयाचे बाकीचे काम बंद करावे लागेल, असेही या विषयात निरीक्षण नोंदवत न्यायालायाने आपले म्हणणे मांडले आहे. केतकीला जामिन मंजूर करताना या विषयावर न्यायालयात सखोल चर्चा झाली.

छायाचित्र
छायाचित्र

By

Published : Jun 18, 2022, 9:21 AM IST

ठाणे -सोशल मीडियावर टिका केल्यानंतर प्रत्येक पोस्टवर गुन्हा दाखल करणार का, असा सवाल विचारण्याची वेळ आली आहे. केतकी चितळे प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर जामिनाच्या सुनावनीवेळी न्यायालायने निरीक्षण नोंदविले आहे. न्यायालयाचे बाकीचे काम बंद करावे लागेल, असेही या विषयात निरीक्षण नोंदवत न्यायालायाने आपले म्हणणे मांडले आहे. केतकीला जामिन मंजूर करताना या विषयावर न्यायालयात सखोल चर्चा झाली.

माहिती देताना वकील

केतकीवर कोरोना काळात अॅट्रॉसिटीचा गुन्हा नवी मुंबईच्या रबाळे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आठ महिन्यांपूर्वी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून केतकीने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, हा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्याच प्रकरणात रबाळे पोलिसांनी केतकीला नुकतीच अटक केली होती. या गुन्ह्यात केतकीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, केतकीने रबाळे पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात जामीन मिळावा यासाठी वकिलामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर गुरुवारी (दि. 16 जून) सुनावणी झाली.

यावेळी ठाणे सत्र न्यायालयाने ( Thane Session Court ) केतकीला 25 हजारांच्या जातमुचलक्यावर व अटीशर्थींवर जामीन मंजूर केला. मात्र, केतकीवर कळवा पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्यातही तिला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. कळव्यात दाखल गुन्ह्यातील जामीन अर्जावर अद्याप न्यायालयाने सुनावणी राखून ठेवल्याने केतकीला सध्या तरी कारागृहात राहावे लागणार आहे. केतकी सध्या ठाणे मध्यवर्ती कारागृहात आहे.

हेही वाचा -Rape Of Minor Girl : अल्पवयीन पुतणीवर काकासह मुलाचाही बलात्कार

ABOUT THE AUTHOR

...view details