ठाणे Lover Try To Kill Girlfriend :वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याचा मुलगा अश्वजीत गायकवाड यानं आपल्या प्रेयसीला किरकोळ वादातून कारखाली चिरडल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली. या घटनेचे पडसाद आता उमटू लागले आहेत. पीडितेवर सध्या ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तिची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
चौकशीसाठी एसआयटी स्थापन : या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तपासासाठी डीसीपी अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय फॉरेन्सिक पुरावे देखील गोळा केले जात आहेत. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. अश्वजीत गायकवाडवर आयपीसी कलम २७९, ३३८, ३२३, ५०४, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण झाला असून, आतापर्यंत ३ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. अश्वजीत गायकवाडवर आयपीसी कलम २७९, ३३८, ३२३, ५०४, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. आतापर्यंत ३ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. आमचा पुढील तपास सुरू आहे - अमरसिंह जाधव, डीसीपी, ठाणे
पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांची माहिती :मुलाने प्रेयसीला कारखाली चिरडल्याप्रकरणी अश्वजीत गायकवाड, रोमिल पाटील आणि सागर शेळके या तिघांवर कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रारदार पीडितेच्या जबानीवरून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आता ठाणे पोलीस आयुक्तांनी सखोल तपासासाठी झोन- 5 चे डीसीपी अमरसिंह जाधव यांच्या अधिपत्याखाली एक एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला आहॆ. साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात असून, फॉरेन्सिक पुरावे गोळा केले जात आहेत. तपासादरम्यान आणखी तथ्य उघड झाल्यास कायद्याच्या पुढील कलमांचा समावेश केला जाणार आहॆ, अशी माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.
पीडितेचा पोलिसांवर आरोप : आरोपी अश्वजीत गायकवाडवर त्याच्या प्रेयसीवर गाडी चालवल्याचा आरोप आहे. पीडित तरुणीनं अश्वजीतसह पोलिसांवर देखील अनेक गंभीर आरोप केले आहेत. पोलीस माझ्यावर जबरदस्ती करून सही घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तिनं केला. "काल रात्री काही पोलीस आले. ते माझ्यावर जबरदस्ती करून काहीतरी सही करण्याचा प्रयत्न करत होते. मी नकार दिला. कारण माझ्याकडे वकील नव्हता. माझ्या कुटुंबातील कोणीही नव्हतं. ते माझ्यावर बळजबरी करत होते. मात्र मी सही केली नाही. त्यानंतर ते रागावले आणि निघून गेले", असं पीडितेनं सांगितलं. मला फक्त न्याय हवा आहे, अशी मागणी तिनं केली आहे.
हे वाचलंत का :
- प्रेयसीला कारखाली चिरडलं; नवीन ट्विस्ट आला समोर, पोलिसांनी जप्त केलेल्या गाडीवरून 'पायलट' लोगोच गायब
- अधिकाऱ्याच्या पोराचा प्रताप; किरकोळ वादातून प्रेयसीला कारखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न, पीडिता गंभीर