ठाणे - गेले दोन दिवस मोठ्या प्रमाणात पोलिसांनी कारवाई केल्यामुळे आज (मंगळवारी) रस्त्यांवर गर्दी कमी प्रमाणात दिसून येत आहे. नेहमीच वाहतूक कोंडी होणाऱ्या मुलुंडच्या आनंदनगर टोल नका इथे देखील सकाळपासून अतिशय कमी वाहने आल्याने आज वाहतूक कोंडी झाली नाही. काल याच ठिकाणी एक ते दीड किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
मुंबईमध्ये प्रवेश करताना मुंबई पोलीस चौकशी करूनच मुंबईचा सोडत असल्याने काल (सोमवारी) अनेक वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली होती. त्याचा धाक म्हणून की काय आज अनेकांनी अनावश्यक करण्यासाठी बाहेर येणे टाळले. त्यामुळे पुन्हा एकदा रस्त्यांवर वाहनांची वर्दळ कमी प्रमाणात दिसून आली.