महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane Flood : मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षापूर्वी मंजुरीसाठी पत्र दिलेला पूल कागदावरच; झोळी करुन महिलांनी न्यावे लागते रुग्णालयात!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गेल्या साडेसात वर्षापासून कार्यरत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यात रस्त्यावर पूल नसल्याने आदिवासी गरोदर महिलांना बांबूची झोळी करुन रुग्णालयात नेण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोखंडेवाडी येथील पूल करण्यासाठी तीन वर्षापूर्वी मंजुरी दिल्याचा दावा या गावातील नागरिक करत आहेत.

Thene Flood
गरोदर महिलांना न्यावे लागते झोळी करुन रुग्णालयात

By

Published : Jul 27, 2023, 9:07 AM IST

Updated : Jul 27, 2023, 10:20 AM IST

मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षापूर्वी मंजुरीसाठी पत्र दिलेला पूल कागदावरच

ठाणे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेली साडेसात वर्ष ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तर वर्षभरापासून राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन वर्षापूर्वी लोखंडेवाडी ते धसईला जोडणाऱ्या रस्त्यावरील ओढ्यावर पूल मंजूर करण्यासाठी तत्कालिन बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना पत्र दिले होते. मात्र हा पूल अद्यापही कागदावरच असल्याने लोखंडेवाडीतील विद्यार्थ्यांसह गावकरी आणि रुग्णांचा झोळीतून जीव धोक्यात घालून पावसाळ्याच्या दिवसात प्रवास सुरू असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच आदिवासी पाड्यावर नाही रस्ता :शिंदे-फडवणीस सरकार सत्तेत आल्यानंतर ‘निर्णय गतिमान, महाराष्ट्र वेगवान’ अशी जाहिरातबाजी सरकराने केली आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जिल्ह्यातच दुर्गम भागातील अनेक गाव पाड्यात जाण्यासाठी आजही रस्ते आणि पूल नसल्याने आदिवासी बाधंवांची अवस्था बिकट झाली आहे. त्यातच ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात अनेक कामे कागदावरच आहेत. अदिवासी वाड्या पाड्यावर अद्यापही मलभूत सोई सुविधापासून गावकरी वंचित असून अनेक अदिवासी वाड्याना अद्यापही रस्ते नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात काही वाड्यांना नदी ओढ्यातील पुराच्या पाण्याच्या प्रवाहातून जा-ये करावी लागते. यामध्ये मुरबाड तालुक्यातील रामपूर ग्रामपंचायत हद्दीतील लोखंडेवाडी या आदिवासी पाडयाचा समावेश आहे.

एकनाथ शिंदे यांनी दिलेले पत्र

गरोदर विवाहितेला बांबूला झोळी बांधून नेले रुग्णालयात :लोखंडेवाडीची अदिवासी लोकवस्ती 150 च्या आसपास आहे. येथील गावकरी, विद्यार्थी, रुग्ण, यांना गावात सुविधा नसल्याने चार किलोमीटर लांब असलेल्या धसई बाजार पेठेत जावे लागते. गेल्या पाच दिवसापासून धुवांधार पाऊस मुरबाड तालुक्यात सुरू असल्याने या भागातील नदी ओढ्याला पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. येथील एका गरोदर विवाहितेला बांबूना चादर गुंडाळून झोळी करून पुरातून जीवघेणा प्रवास केला. या गावकऱ्यांनी गरोदर महिलेला घेऊन 4 किमी अंतर पायपीट करत धसईमधील आरोग्य केंद्र गाठल्याने .

सर्पदंश झालेल्या महिलेला पुरामुळे मिळाले नाहीत उपचार :या वाडीलगत असलेल्या ओढ्याला पावसाळ्यात पूर येतो. खळबळजनक बाब म्हणजे सन 2011 ला याच वाडीतील रुपाबाई भाऊ वाघ ( वय, 45) या महिलेस रात्री सर्पदंश झाला होता. मात्र ओढ्याला पूर असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करता आले नाही, त्यातच उपचाराअभावी या महिलेचा बळी गेल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. या घटनेनंतर धनाजी वाघ या तरुणाने 2016 पासून या वाडीलगतच्या ओढ्यावर पूल करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे मागणी केली. त्यानंतर सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री असताना धनाजीने त्यांची भेट घेऊन पुलाची मागणी करत पाठपुरावा केला. त्याच्या पाठपुराव्याला यश येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2020 साली पुलाच्या मंजुरीसाठी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना पत्र दिले होते.

लोखंडेवाडीतील गावकऱ्यांची कधी होणार डोलीतून सुटका :दुसरीकडे तालुक्यातील अनेक नेते, 'कार्यसम्राट' नावाने प्रसिद्ध असतानाही या गावात अद्यापही रस्ता नाही. लोखंडेवाडीतील गावकऱ्यांची ‘डोली’तून सुटका होत नसल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या नियोजन सभेत पूल उभारण्यासाठी ठराव मंजूर झाला होता. आता त्या ठरावला चार वर्ष झाली. ठाण्याचे पालकमंत्री व मुख्यमंत्री यांना देखील प्रत्यक्ष भेटून पत्रव्यावहार करण्यात आला. मात्र एवढे करुनही पुलाची प्रतिक्षा असल्याची खंत पुलासाठी पाठपुरावा करणाऱ्या धनाजी वाघसह गावकरी व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा -

Last Updated : Jul 27, 2023, 10:20 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details