ठाणे -भिवंडीतील खाडीपार भागातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे रिक्षातून अपहरण केले होते. त्यानंतर तिच्यावर टेकडी भागातील एका खोलीत डांबून ठेवत दोन दिवस बलात्कार करण्यात ( Minor Girl Rape Case In Bhiwandi ) आला होता. याप्रकरणी आरोपीला विशेष पोक्सो ठाणे न्यायालयाने शनिवारी ( 16 एप्रिल ) अंतिम निकाल देत सात वर्षांचा तुरुंगवास आणि ८ हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली ( Posco Court Man Gets 7 Year Jail ) आहे. सद्दाम उर्फ गुड्डू इस्त्राइल अन्सारी ( वय, ३१ रा. भिवंडी ) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
अपहरण करून बलात्कार - पीडित मुलगी भिवंडीतील खाडीपार परिसरात राहते. १७ एप्रिल २०१८ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी कपडे शिवण्याचा लागणारा धागा खरेदीसाठी घराबाहेर पडली होती. त्यावेळी आरोपी सद्दामने तीला बहाण्याने रिक्षात बसवून तिचे अपहरण केले होते. अपहरण केल्यानंतर तिला भंडारी कंपाऊंडच्या पलीकडे असलेल्या टेकडीवरील एका भाड्याच्या खोलीत नेऊन तिला डांबून ठेवले. त्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने दोन दिवस बलात्कार केला. पीडित मुलगी १७ एप्रिलपासून घरी आली नसल्याने तिच्या नातेवाईकांनी शोध सुरु केला. त्यातच पीडितेच्या नातेवाईकांनी १८ एप्रिल रोजी आरोपीच्या घरी पोहोचून दरवाजाचे कुलूप तोडले असता पीडित मुलगी त्या बंदिस्त खोलीत असल्याचे आढळून आली. त्यानंतर नातेवाईकांनी तिची सुटका करून तिला घरी आणले. त्यावेळी तिने घडलेला प्रसंग नातेवाईकाला सांगितला. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात अपहरण व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.