ठाणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक वस्तुंची दुकाने सोडून बाकी सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. अशावेळी अत्यावश्यक वस्तू घेताना नागरिकांची दुकानांमध्ये गर्दी होऊ नये यासाठी शहर पोलिसांनी अभिनव कल्पना राबविली आहे. दुकानांसमोर नागरिकांमध्ये पुरेसे अंतर राहावे यासाठी पोलिसांनी तीन फुटाचे चौकोन बनवले आहे.
कोरोनाचा संसर्ग होवू नये म्हणून ठाणे पोलिसांनी केला 'हा' उपाय - ठाणे
अत्यावश्यक वस्तू घेताना नागरिकांची दुकानांमध्ये गर्दी होऊ नये यासाठी शहर पोलिसांनी अभिनव कल्पना राबविली आहे. दुकानांसमोर नागरिकांमध्ये पुरेसे अंतर राहावे यासाठी पोलिसांनी तीन फुटाचे चौकोन बनवले आहे.
चौकोन बनवताना पोलीस
दुकानांसमोर बनवण्यात आलेल्या चौकोनामध्ये उभे राहून नागरिकांना एकमेकांपासून अंतर ठेवता येणार आहे. त्यामुळे, गर्दीवर आळा बसून कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शहरातील मोठ मोठ्या जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना हा नियम लागू करण्यात आला आहे.
हेही वाचा-कोरोना लॉकडाऊन ! संचारबंदीचा आदेश धुडकावणारे काय करताहेत पाहा...