महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना न केल्याने दोन कारखान्यांवर कारवाई - ठाणे कोरोना लॉकडाऊन

पार्वती फूड प्रॉडक्ट्सचे चंदरलाल बी गंबानी आणि भारत फूड प्रॉडक्ट्सचे मालक हरी सनानीकरण, किशन काशवानी, नामदेव काशवानी असे गुन्हे दाखल झालेल्या कारखान्यांच्या मालकांचे नावे आहेत.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना न केल्याने दोन कारखान्यांवर कारवाई
कोरोना प्रतिबंधक उपाययोजना न केल्याने दोन कारखान्यांवर कारवाई

By

Published : Apr 19, 2020, 9:23 PM IST

ठाणे - कोरोना विषाणुचा सर्वत्र प्रादुर्भाव असताना उल्हासनगरातील दोन बिस्कीट कारखान्यांमध्ये कामगारांसाठी मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर उपलब्ध न करणे तसेच सावधगिरीच्या दृष्टीने उपाययोजना न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी कारखान्यांच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पार्वती फूड प्रॉडक्ट्सचे चंदरलाल बी गंबानी आणि भारत फूड प्रॉडक्ट्सचे मालक हरी सनानीकरण, किशन काशवानी, नामदेव काशवानी असे गुन्हे दाखल झालेल्या कारखान्यांच्या मालकांचे नावे आहेत.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना न केल्याने दोन कारखान्यांवर कारवाई


उल्हासनगर ४ नंबर येथील वाको रेडीओ कंपाऊंड या परिसरात पार्वती फूड प्रोडक्ट अँड बिस्कीट आणि भारत फूड प्रॉडक्ट अँड बिस्कीट हे दोन कारखाने असून या कारखान्यांमध्ये बिस्कीट, ब्रेड , केक आदी पदार्थ बनविले जातात. महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असताना निवडक उद्योगधंदे सुरू ठेवण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे. त्यात पार्वती फूड प्रोडक्ट अँड बिस्कीट आणि भारत फूड प्रोडक्ट अँड बिस्कीट या बनविणाऱ्या कंपनींनादेखील परवानगी मिळाली होती. मात्र, या कारखान्यांमध्ये कामगारांना मास्क, सॅनिटायझर, ग्लोव्हज देण्यात येत नसल्याच्या तक्रारी कामगारांनी स्थानिक नागरिकांकडे केल्या होत्या. ही बाब मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना समजल्यानंतर त्यांनी प्रभाग 3 चे साहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांना या कारखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.


दरम्यान, याप्रकरणी शिंपी यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी पार्वती फूड प्रॉडक्ट्सचे चंदरलाल बी गंबानी आणि भारत फूड प्रॉडक्ट्सचे मालक हरी सनानीकरण, किशन काशवानी, नामदेव काशवानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार पालवे हे करीत आहेत. सदर कारखानदार हे कामगारांना वेळेवर पगार देत नसल्याच्या तक्रारीदेखील काही कामगारांनी केल्या आहेत. याबाबत सुद्धा पोलीस तपास करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details