ठाणे -कळवा परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर परप्रांतातील मजूर किंवा नागरिक मोठ्या प्रमाणावर राहत आहेत. त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी आज ठाण्यातील कळवा पोलीस ठाणे या ठिकाणी स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि पोलीस यांच्यात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
गर्दी कमी करण्यासाठी कळवा पोलिसांची अनोखी शक्कल; ग्रुप लीडर करणार कागदपत्रांची पूर्तता
कळवा पोलीस ठाणे या ठिकाणी स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि पोलीस यांच्यात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
गर्दी कमी करण्यासाठी कळवा पोलिसांची अनोखी शक्कल; ग्रूप लीडर करणार कागदपत्रांची पूर्तता
सरकारच्या वतीने परप्रांतात किंवा जिल्ह्यात जाण्यासाठी रेल्वेची किंवा वैयक्तिक वाहनांची व्यवस्था केली जाणार होती. यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गावाला जाण्यासाठी एक ग्रुप लीडर तयार करण्यात येणार असून त्यांच्यामार्फत कागदपत्रे घेऊन त्यानंतर पोलिसांच्यामार्फत परवानगी दिली जाणार आहे, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.