महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 11, 2021, 3:47 PM IST

ETV Bharat / state

बजाज फायनान्सच्या नावाखाली चालणाऱ्या बोगस कॉल सेंटरवर पोलिसांची छापेमारी

लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन माध्यमातून सर्वसामान्य लोकांना फसविण्याचे प्रमाण वाढले आहे. ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांवर पोलिसांकडून करडी नजर ठेवून कारवाई केली जात आहे. अशाच एका टोळीचा छडा लावण्यात क्राइम ब्रँचच्या कल्याण युनिटला यश आले आहे.

बोगस कॉल सेंटरवर पोलिसांची छापेमारी
बोगस कॉल सेंटरवर पोलिसांची छापेमारी

ठाणे - बजाज फायनान्सच्या नावाखाली डोंबिवलीत सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरवर नांदेड पोलिसांनी धाड टाकली. नांदेड पोलीस आणि कल्याण क्राइम ब्रँचने आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली आहे. दिनेश मनोहर चिंचकर (31) आणि रोहित पांडुरंग शेरकर (28) असे अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.

नांदेड कनेक्शनमुळे उघडकीस आले बोगस कॉलसेंटर
कर्जाचे आमिष दाखवून सर्वसामान्य गरजूंना गंडा घालण्यासाठी, बजाज फायनान्स कंपनीचे लोन देण्याच्या नावाखाली लोकांना आगाऊ पैसे भरण्यास लावून फसवणूक करणाऱ्या टोळीबाबत नांदेड पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारदारांना ज्या मोबाइल क्रमांकावरून कॉल आले, त्याचे तांत्रिक विश्लेषण सुरू केले असता, ही टोळी ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे असल्याची माहिती मिळाली.

क्राइम ब्रँच कल्याण युनिटची कामगिरी

नांदेड पोलिसांनी क्राइम ब्रँचचे फौजदार नितीन मुदगुन यांच्याशी संपर्क साधला. पोलीस पथकाने डोंबिवली येथील बनावट कॉल सेंटर शोधून काढले. बुधवारी रात्री नांदेड पोलिसांसह क्राइम ब्रँचच्या कल्याण युनिटने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या नेतृत्वाखाली स. पो. नि. भूषण दायमा, फौजदार नितीन मुदगून, मोहन कळमकर, आदींच्या पथकाने डोंबिवलीतील के. व्ही. पेंढरकर कॉलेज समोरील सिटी मॉलच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या 116 क्रमांकाच्या गाळ्यावर छापा टाकला. या सेंटरमध्ये दिनेश मनोहर चिंचकर आणि रोहित पांडुरंग शेरकर हे दोघे आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले.

उत्तरप्रदेशमध्ये काही साथीदारांच्या मदतीने बनावट कॉल सेंटर
आरोपी चालवत असलेल्या या बोगस कॉल सेंटरमध्ये 18 ते 20 कर्मचारी नोकरीला ठेवले आहेत.तसेच उत्तरप्रदेश राज्यातील काही साथीदारांच्या मदतीने बनावट कॉल सेंटर चालवत असल्याचे आढळून आले. मोबाइल क्रमांकाचा ऑनलाइन डाटाबेस मिळवून सेंटरवर ठेवलेल्या कर्मचाऱ्यांना प्राप्त मोबाइल क्रमांकाच्या डाटाबेसमधील क्रमांकावर फोन करण्यास लावले जात असे. चौकशीदरम्यान बजाज फायनान्स कंपनीमार्फत कर्ज मिळवून देतो, असे अमिश दाखवून कर्ज पास करण्याकरिता आगाऊ रक्कम भरण्यात लावून गरजूंची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा- डोंबिवलीतील सेव्हन स्टार बारमध्ये कल्याण गुन्हे शाखेची छापेमारी

ABOUT THE AUTHOR

...view details