महाराष्ट्र

maharashtra

वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या लॉजवर पोलिसांचा छापा; ५ बळीत महिलांची सुटका

By

Published : Sep 11, 2021, 7:38 AM IST

उल्हासनगरातील एका लॉजवर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून वेश्या व्यवसायाच्या रॅकेटचा फर्दाफ़ाश केला आहे. या छापेमारीत पोलिसांनी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या लॉज चालकाला अटक केली आहे. तर ५ बळीत महिलांची सुटका केली आहे.

वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या लॉजवर पोलिसांचा छापा
वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या लॉजवर पोलिसांचा छापा

ठाणे - उल्हासनगर शहरात लॉकडाऊन संपातच अनलॉक काळापासून विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर लॉजिंग व्यवसाय फोफावला आहे. त्यातच एका लॉजवर उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून वेश्या व्यवसायाच्या रॅकेटचा फर्दाफ़ाश केला आहे. या छापेमारीत ५ बळीत महिलांची सुटका केली आहे. तर लॉज चालकावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. जीवन शेट्टी (वयं ४२ वर्ष, रा. रा. मानपाडा डोंबिवली ) असे आरोपीचे नाव आहे.

बनावट ग्राहक पाठवून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश ..
उल्हासनगर मधील ४ नंबर परिसरात अशाळे गावातील श्रीरामनगर मध्ये पूनम नावाचे लॉजिंग अँड बोर्डिंग असून या ठिकाणी काही महीलांकडून अनैतिक शारीरिक व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारवर तेथील वेश्या व्यवसायासाठी महिला पुरविणाऱ्या लॉज चालकाशी संपर्क साधून गुरुवारी सायंकाळच्या सुमारास बनावट ग्राहक पाठवला होता. त्यांनतर या लॉजवर वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी लॉज चालकाला ताब्यात घेऊन त्याच्या तावडीतून पाच बळीत महिलांची सुटका केली आहे.

बळीत महिलांची रवानगी महिला सुधारगृहात -


लॉज चालक जीवन शेट्टी याच्या विरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात पिटा कायद्यांतर्गत गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील (वाय ५३) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. तर ५ बळीत महिलांची रवानगी महिला सुधारगृहात कऱण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. पी. थोरात करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details