महाराष्ट्र

maharashtra

Thane Crime एटीएमची आदलाबदल करुन फसवणूक करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, १०१ एटीएम कार्ड जप्त

By

Published : Jan 13, 2023, 6:34 PM IST

एटीएमद्वारे बँकेच्या ग्राहकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या आरोपींच्या सोलापूर, पंढरपूर येथून मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. या टोळीकडून 101 एटीएम कार्ड पोलिसांनी जप्त केले आहेत. ही टोळी ग्राहकांना मदत करण्याच्या बहाण्याने फसवत होती. दरम्यान अटक करुन त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी ठोठावली आहे.

ATM Fraud Gang Bust
आरोपींसह ठाणे पोलीस

एटीएमची आदलाबदल करुन फसवणूक करणारी टोळी जेरबंद

ठाणे -एटीएममधून पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांना मदतीच्या बहाण्याने फसवणाऱ्या टोळीच्या ठाणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ही टोळी मदतीच्या बहाण्याने बँकेच्या ग्राहकांचे पीन क्रमांक घेऊन एटीएमची आदलाबदल करत होते. ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने या टोळीच्या मुसक्या आवळल्याने टोळीकडून गुन्ह्यांची मोठी मालिकाच उघड झाली आहे. या टोळीकडून पोलिसांनी विविध बँकेचे १०१ एटीएम कार्ड, रोख रक्कम आणि गुन्ह्यातील वाहन असा ४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या आरोपींचा आहे टोळीत समावेशगुन्हे शाखा खंडणी विरोधी पथकाने मुसक्या आवळलेल्या आरोपींमध्ये सनी मुन्ना सिंग उर्फ सनी चिकना, ( वय २८ , रा. २/५ झोपडपट्टी एरीया, संदिप कॉलनी, साईबाबा मंदिराजवळ कोळशेवाडी ) आरोपी श्रीकांत प्रकाश गोडबोले उर्फ श्री, ( वय २८, रा. भैयासाहेब आंबेडकर नगर, खेमाणी, उल्हासनगर ) आरोपी हरीदास मोहन मगरे, उर्फ हन्या ( वय २५, भैयासाहेब आंबेडकर नगर, खेमाणी, उल्हासनगर ) आरोपी रामराव उर्फ कचरू शेंडफड शिरसाठ ( वय ३५, रा. अमरधाम चौक, खेमाणी, उल्हासनगर ) ठाणे यांचा समावेश आहे.

महिलेला घातला हजारोचा गंडाठाण्यातील रुपाली सतिश बोचरे या खासगी कंपनीत कन्सल्टंट आहेत. त्यांचे एसबीआय बँकमध्ये बचत खाते होते. त्यांना नातेवाईकाला ५० हजार रुपये ऑनलाईन प्रणालीने २ जानेवारीला पाठवायचे होते. म्हणून खात्यात पैसे भरण्यासाठी त्या रोड नं २२ जवळ एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये आल्या. अगोदरपासूनच सावज टिपण्यासाठी बसलेल्या आरोपीने सावज टिपत तक्रारदार बोचरे यांना ३८ हजार ५०० रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

पंढरपूर सोलापुरातून अशा आवळल्या आरोपीच्या मुसक्यादाखल गुन्ह्याची गंभीर दखल घेत खंडणी विरोधी पथकाने समांतर तपास सुरु केला. सीसीटीव्हीद्वारे संशयितांची माहिती मिळावत तांत्रिक तपासावरुन आरोपींची माहिती मिळवली. आरोपी हे पंढरपूर सोलापूर येथे पळून गेल्याची माहिती मिळताच पंढरपूर पोलिसांना संपर्क करत तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या माहितीद्वारे पथकाने उल्हसनगर येथील आरोपी ताब्यात घेतला आणि गोरखधंदा चालवणाऱ्या टोळीचा फर्दाफास झाला. पोलीस पथकाने चार आरोपींच्या मुसक्या आवळत त्यांना न्यायालयात नेले असता त्यांना १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे.

गुन्ह्याची मालिका झाली उघडविविध पोलीस ठाण्यात गुन्ह्याची अनेक गुन्हे दाखल होते. यातील या टोळीने अनेक गुन्हे केल्याचे उघड झाले. यात आरोपी सनी मुन्ना सिंग याच्या विरोधात विविध ९ गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. तर आरोपी श्रीकांत प्रकाश गोडबोले उर्फ श्री याच्या विरोधात विविध ९ गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. अटक चार आरोपींच्या चौकशीत ८ गुन्ह्याची उकल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा - Amravati Crime मध्यरात्री तरुणीचे अपहरण: अज्ञातस्थळी तीन महिने डांबून नराधमाने अत्याचार केल्याने झाली गरोदर

ABOUT THE AUTHOR

...view details