ठाणे - ऑनलाईन बँक खाते हॅक करून खातेदारांची फसवणूक करणाऱ्या आणि सोबत गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीला मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई दिवा शीळ रोड, दिवा स्टेशन जवळ कण्यात आली. आरोपीकडून १० हजाराचा गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे.
ऑनलाईन बँकखाते हॅक करून नागरिकांची फसवणूक; गावठी कट्टा बाळगणारा आरोपी जेरबंद - Hacker
आरोपी रमेश जगदीश कावरिया (३२ रा. चेंबूर, मुंबई) हा ऑनलाईन बँकेची खाती हॅक करून त्यातील रक्कमेचा अपहार करायचा, अशा प्रकारे त्याने अनेक खातेदारांना गंडा घातला होता. त्याच्या विरोधात वनराई पोलीस ठाणे आणि सायबर गुन्हे शाखा हैद्राबाद येथे दोन गुन्हे दाखल होते. हा आरोपी फरार होता.
आरोपी रमेश जगदीश कावरिया (३२ रा. चेंबूर, मुंबई) हा ऑनलाईन बँकेची खाती हॅक करून त्यातील रक्कमेचा अपहार करायचा, अशा प्रकारे त्याने अनेक खातेदारांना गंडा घातला होता. त्याच्या विरोधात वनराई पोलीस ठाणे आणि सायबर गुन्हे शाखा हैद्राबाद येथे दोन गुन्हे दाखल होते. हा आरोपी फरार होता. आरोपी रमेश कावरिया भारत को ऑप बँक, श्रीकृष्ण पार्क, दिवा शीळरोड, दिवा स्टेशनजवळ, दिवा पूर्व येथे असल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे शोध खाकेच्या पथकाला मिळाली. पोलीस पथकाने दिवा पूर्व भागात आलेल्या कावरिया याला अटक केली. त्याच्या अंगझडतीत पोलिसांनी त्याच्याकडील १० हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा कट्टा हस्तगत केला. त्याच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल कारण्यात आला आहे.
पोलिसांनी केलेल्या अधिक चौकशीत आरोपी रमेश कवारिया याने ऑनलाईन बँक खाते हॅक करून २३ लाखाच्या रक्कमेची अफरातफरी केल्याची कबुली पोलिसांना दिली. कवारिया वर महाराष्ट्र आणि इतर राज्यात गुन्हे दाखल आहेत. त्यांने खातेदारांची खाती हॅक करून लाखोंचा अपहार केल्याचे तपासात समोर आले आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त एन. टी कदम गुन्हे शॊध पथक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.