ठाणे -सर्वसामान्य व्यक्तीचा विश्वास संपादन करून शिर्डी व सिद्धिविनायक मंदिरातील जमा होणारी चिल्लर रक्कम सोन्याची बिस्किटे देवून त्या मोबदल्यात कमी रक्कम स्वीकारण्याचा बहाणा करून लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला जेरंबंद करण्यात पोलिसांना यश आले. शिळ डायघर पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना अटक केली असल्याची माहिती परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा - सातारा पोलीस अधिक्षकांची कारवाई; तिघांना एका वर्षासाठी तडीपार
१३ जुलैला कल्याणफाट्याजवळ हॉटेल शालू येथे लेदरचा व्यवसाय करणारे निशाद अहमद शेख (४२) यांना कमल व चेतन या फसवणूक करणाऱ्या दोघांनी बोलावून योग्य दरात लेदर देतो असे सांगितले. दोघांनी निशाद यांच्याकडून २ लाख रुपये घेतले व गोडावून दाखवण्याच्या बहाण्याने पळ काढला. याप्रकरणी दोघांविरुद्ध शीळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या तपासात आरोपी हे मोबाईल तंत्रज्ञानाने अद्यावत असल्याचे तसेच वेळोवेळी सिमकार्ड व मोबाईल बदलत होते. त्यामुळे त्यांना पकडणे आव्हानात्मक व जिकरीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.