ठाणे - धावत्या ट्रेनमधून अभिनेत्रीच्या हातावर काठीने फटका मारून, मोबाइल पळवणाऱ्याला कल्याण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या चोरट्याकडून पळवलेला मोबाइल पोलिसांनी जप्त केला आहे. राजू केंगर असे या ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
धावत्या ट्रेनमधून अभिनेत्रीचा मोबाइल पळवणाऱ्याला ठाणे पोलिसांकडून अटक - Actress's mobile thief arrested by police
धावत्या ट्रेनमधून अभिनेत्रीचा मोबाइल पळवणाऱ्याला कल्याण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या चोरट्याकडून अभिनेत्रीचा पळवलेला मोबाइल पोलिसांनी जप्त केला आहे. राजू केंगर असे या ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर पुन्हा रेल्वे स्थानकावर मोबाइल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. ४ जूनला अभिनेत्री अंजिता अधिकारी या पाटणा एक्स्प्रेसमधून प्रवास करत होत्या. आंबिवली रेल्वे स्थानकाजवळ गाडी थांबली. त्यानंतर अंजिता या गाडीच्या दारात उभ्या राहून मोबाइलवर कुणाशीतरी बोलत होत्या. इतक्यात अंजिता यांच्या हातावर एकाने काठी मारून त्यांच्या हातातील मोबाइल पळवून तो पसार झाला.
'दोन दिवसांची पोलीस कोठडी'
कल्याण रेल्वे स्थानकात आल्यावर अंजिता यांनी कल्याणच्या लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मीक शार्दुल यांच्या मागर्दर्शनाखाली पोलीस अधिकारी पंढरी कांदे यांच्या पथकाकडे हा तपास सोपवण्यात आला. अखेर, अभिनेत्री अंजिता अधिकारी यांचा मोबाइल पळणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राजू केंगर हा आंबिवली जवळच्या लहूजी साळवेनगर झोपडपट्टीत राहतो. त्याने कल्याण-आंबिवली रेल्वे स्थानकाच्या परिसरात आतापर्यंत ७ गुन्हे केल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले आहे. त्याच्या विरोधात यापूर्वीही मोबाइल हिसकावण्याचे गुन्हे दाखल आहेत.