ठाणे -भारत सरकारच्या वतीने 2020मध्ये केलेल्या सर्वेक्षणात ठाणे शहराने देशात चौदावा क्रमांक, तर राज्यात तिसरा क्रमांक पटकवला आहे. केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नगर विकास विभागाच्यावतीने दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवण्यात येते. यामध्ये ठाणे शहराने आपला ठसा उमटवला आहे.
सन 2020 रोजी कचऱ्याचे संकलन आणि त्याची वाहतूक, प्रक्रिया, साफसफाई, जनजागृती, क्षमतावृध्दी आणि निकषांवर हे स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले होते. या सर्वेक्षणामध्ये यावर्षी ठाणे शहरात गतवर्षीच्या 57 व्या क्रमांकावरून देशात 14 व्या क्रमांकावर आघाडी घेतली आहे. तर राज्यात ठाणे शहराने 3 रा क्रमांक पटकवला आहे. या यशाबद्दल महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी घनकचरा व्यवस्थापन टीमचे अभिनंदंन केले आहे.