महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुप्रिया सुळेंसोबत गैरवर्तन प्रकरण; ठाण्यातील राष्ट्रवादी आघाडीच्या महिलांनी काळ्या साड्या घालून केला निषेध - thane ncp womens protest

दादर रेल्वे स्टेशनवर खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत गैरवर्तनाचा प्रकार घडला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने काळ्या रंगाच्या साड्या परिधान करून, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी  टॅक्सीचालकावर कडक कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी  केली.

ठाणे राष्ट्रवादी महीला आघाडी

By

Published : Sep 13, 2019, 6:05 PM IST

ठाणे -दादर रेल्वे स्टेशनवर खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत गैरवर्तनाचा प्रकार घडला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने काळ्या रंगाच्या साड्या परिधान करून, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी टॅक्सीचालकावर कडक कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

सुप्रिया सुळे यांच्यासोबतच्या गैरवर्तानविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

हेही वाचा - डांबर चोर आमदाराने १५ वर्षात काहीही विकास केला नाही, निलेश राणेंचा सामंतांवर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड आणि ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटले. दरम्यान, देशाच्या खासदार सुरक्षित नसून इतर महिलांचे काय? असा सवाल यावेळी विचारण्यात आला. महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे का? असाही प्रश्न विचारण्यात आला. आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच संबंधित टॅक्सी चालकास लवकरात लवकर अटक करून कारवाई करण्याची मागणी ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी केली.

हेही वाचा - ‘भाजपचा झेंडा दिसला तर घरात घुसून मारू’, काँग्रेस आमदार सुनील केदारांची भाजप कार्यकर्त्यांना धमकी

हेही वाचा - उदयनराजेंचा भाजप प्रवेश दिल्लीतच होणार! चंद्रकांत पाटलांना आशावाद

ABOUT THE AUTHOR

...view details