ठाणेThane Murder News : पान टपरीच्या गल्ल्यातून आपला कामगार पैसे लंपास करीत असल्याच्या संशयातून टपरीच्या मालकानं एका साथीदारासह कामगाराची गळा चिरून हत्या केल्याची घटना समोर आलीय. ही घटना भिवंडी तालुक्यातील कुकसे गावाच्या हद्दीत घडलीय. धक्कादायक बाब म्हणजे हत्या करून कामगाराचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं चिंचवली गावाच्या हद्दीतील झाडीझुडपात फेकून दिला होता.
दोघांना अटक :याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात हत्येसह पुरावा नष्ट केल्याप्रकरणी मालकासह त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केलीय. मोहंमद उमर जलीलउद्दिन शेख, (रा. मिल्लतनगर भिवंडी) आणि त्याचा साथीदार मोहंम्मद मोमीन शेख असे अटक आरोपीचे नावे आहेत. तर मोहम्मद मोकीन नूर (वय २८) असे हत्या झालेल्या कामगाराचं नाव आहे. तो मूळचा बिहार राज्यातील आहे.
गल्ल्यातील पैश्यावरून वाद :पोलीस सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मालक मोहंमद उमर हा भिवंडी तालुक्यातील कुकसे गावाच्या हद्दीतील पाकिजा हॉटेलमध्ये सुपरवायजर म्हणून कार्यरत होता. तर त्याचे याच हॉटेल समोरच पानटपरी आहे. याच पान टपरीवर मृतक मोकीन नूर हा कामगार म्हणून कामाला होता. त्यातच गेल्या काही दिवसांपासून आरोपी मालकाला संशय होता की, आपला कामगार पान टपरीच्या गल्ल्यातून पैसे चोरी करत असल्याचा संशय (Murder News) होता. यामुळेच (आज) ११ संप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गल्ल्यातील पैश्यावरून वाद झाला असता, मालकाने मृतकच्या मोबाईल कव्हर चेक केले त्यावेळी त्यामध्ये दीड हजार रुपये आढळून आले. हे पाहून मालकाला राग येताच त्याने साथीदाराला बोलावले. आज त्याने तीन वाजल्याच्या सुमारास कामगाराची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह जवळ असलेल्या चिंचवली गावाच्या हद्दीतील झाडाझुडपात फेकून (marathi crime news) दिला.
घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा :दरम्यान या घटनेची माहिती पाकिजा हॉटेल मॅनेजर विनय निरंजन (वय ४३) यांना मिळताच त्यांनी पडघा पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिलीय. माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक प्रशांत ढोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. त्यानंतर कामगाराचा मृतदेह मुंबईतील जे. जे. रुग्णालयात रवाना (owner killed worker) केला. त्यानंतर आज 11 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास पडघा पोलीस ठाण्यात हॉटेल मॅनेजर निरंजन यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. काही तासातच दोन्ही आरोपींना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी दिलीय. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय कदम करीत आहेत.
हेही वाचा :
- Son Killed Mother : धक्कादायक! मुलानं केली आईची हत्या; कारण ऐकून बसेल धक्का...
- Morshi Murder Case : मोर्शी खून प्रकरणात धक्कादायक खुलासा, सलाईनमधून दिलं आई आणि लहान भावाला 'प्रतिबंधित औषध', कारण...
- Chandrapur Murder : तुरुंगातुन सुटून आल्यानंतर दोन दिवसानंतर खून, अटकेनंतरच्या 'त्या' कृत्यानं पोलीसही चक्रावले!