महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane Murder News : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या प्रकरण; प्रियकराला पश्चिम बंगालमधून अटक - शब्बीर दिलावर शेख

Thane Murder News : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी तिच्या प्रियकराला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आलीय. पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत काय सांगितलंय, ते सविस्तर जाणून घेऊ या. (murder of woman living in live in relationship)

Thane Murder News
गुन्हेगाराला अटक

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 21, 2023, 7:24 PM IST

पोलीस अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

ठाणेThane Murder News : नवरा सोडून प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह तिच्या राहत्या घरातील किचनमध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यामुळं एकच खळबळ उडाली होती. ही घटना भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथील गणेशनगरमधील एका घरात घडली. तिच्यासोबत राहणारा प्रियकर घटनेच्या दिवसापासून फरार झाला होता. तिच्या फरार प्रियकराला पोलीस पथकानं वेषांतर करून पश्चिम बंगालच्या एका रुग्णालयाच्या दारातच झडप घालून अटक केलीय. शब्बीर दिलावर शेख (वय ३२) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.


मृतकाच्या चारित्र्यावर संशय : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक महिला नवऱ्यापासून विभक्त राहात होती. आरोपी शब्बीर हा मूळचा पश्चिम बंगाल राज्यात राहणारा आहे. त्याला पत्नी आणि आठ वर्षाची मुलगी आहे. तो कुटुंबाच्या उपजीविकेसाठी अंबरनाथ एमआयडीसीत एका कंपनीत काम करत होता. त्यावेळी दोघांची ओळख झाली. त्यानंतर प्रेमाचं सूत जुळल्यानं दोघांमध्ये अनैतिक संबध निर्माण झाले. त्यानंतर या दोघांनी कोनगाव भागात गणेशनगर येथील खोली भाड्यानं घेतली. त्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ते राहात होते. मात्र, आरोपी प्रियकर हा मृतकच्या चारित्र्यावर नेहमीच संशय घ्यायचा. १५ सप्टेंबर रोजी दोघांमध्ये याच कारणावरून भांडण झालं. आरोपीनं या महिलेचा धारदार कटरनं गळा चिरला. तसंच दोन्ही हाताच्या नसा कापून तिला ठार मारलं. घराला बाहेरून कुलुप लावून तो पळून गेला.


महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह : १८ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास खोलीतून दुर्गंध येत होता. त्यामुळं आजूबाजूच्या नागरिकांनी कोनगाव पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यांनतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार आणि गुन्हे पोलीस निरीक्षक दीप बने हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. ते खोलीच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात गेले असता, घरातील किचनमध्ये मृत महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यानंतर कोनगाव पोलिसांसह फॉरेन्सिक पथक पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केलाय. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात पाठवला होता.


कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा : मृत महिलेच्या मैत्रीणीच्या तक्रारीवरून आरोपी शबीर याच्यावर १९ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळावरून पोलिसांनी एक धारदार कटर जप्त केलाय. त्या खोलीत मृत महिला एकटीच राहत होती. मात्र कधी-कधी तिच्यासोबत आणखी एक महिला किंवा एक पुरुषही राहात होते, अशी माहिती पोलीस पथकाला तपासात समोर आलीय. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी हा मूळचा पश्चिम बंगालमधील उत्तरदिनाजपूर जिल्ह्यातील रहिवाशी आहे. तो त्याच्या सासुरवाडीत असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली.

वेषांतर करून सापळा रचला : घटनेच्या दिवशी प्रेयसीसोबत झालेल्या झटापटीत त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यामुळं तो पश्चिम बंगालमधील सासुरवाडी असलेल्या सारापूर गावातील एका रुग्णालयात उपचार करण्यासाठी गेला होता. हे समोर येताच एपीआय वैभव चुंबळे, विनोद कडलक यांच्यासह कोनगाव पोलीस पथकाने रुग्णालय आवारात वेषांतर करून सापळा रचला होता. उपचार करून बाहेर पडताच आरोपीवर झडप घालून त्याला ताब्यात घेतलंय. त्यानंतर पश्चिम बंगालवरून २१ सप्टेंबर रोजी कोनगाव पोलीस ठाण्यात आणून त्याला अटक केली, अशी माहिती पोलीस उपआयुक्त नवनाथ ढवळे यांनी दिलीय. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) दीप बने करीत आहेत.


हेही वाचा :

  1. Thane Murder News : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या; प्रियकर फरार
  2. Little Girl Rape Case : चॉकलेटच्या बहाण्याने चिमुरडीवर अत्याचार करून हत्या, नराधमाला बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांनी वापरली 'ही' युक्ती
  3. The in laws killed woman : गोळीबार करून सासरच्या मंडळीनी केली विवाहितेची हत्या; पतीसह ६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details